सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नाना पेठ येथील वाड्याला लागली भीषण आग,आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही .
 शहर

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात मा. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्ष BBA,BBA(CA),BBA(IB)BCA(Science) या विद्यार्थ्यांसाठी Induction program व पालकांसाठी पालक सभेचे आयोजन

डिजिटल पुणे    11-04-2025 10:48:38

पुणे : दि.04/05/2025 रोजी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्रथम वर्ष BBA,BBA(CA),BBA(IB)BCA(Science) या विद्यार्थ्यांसाठी Induction program व त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी पालक सभेचे मा. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आशा माने यांनी केले त्यामध्ये त्यांनी BBA व BCA या कोर्सेसची व AICTE ची माहिती दिली.

या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थी व पालक यांच्यासोबत संवाद साधताना महाविद्यालयाची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना व पालकांना दिली तसेच विद्यार्थ्यांसाठी असणारे महाविद्यालयातील विविध संसाधने जसे की INCUBATION CENTRE त्यामध्ये असणारे MEDITATION ROOM, अभ्यासिका , व्यायामशाळा, SYNTHETIC GROUND याचा परिचय व याची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच त्यांनी शिक्षणाबरोबरच योगासन व व्यायामाचे विद्यार्थ्यांचा जीवनातील महत्त्व समजावून सांगितले व महाविद्यालयाला नॅक कडून प्राप्त झालेल्या A+ ग्रेड विषयी माहिती दिली.

या कार्यक्रमात प्रथम वर्षातील 108 मुले व त्यांच्या पालकांचा समावेश होता तसेच पालक प्रतिनिधी म्हणून शेलार मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयातील मुलींच्या सुरक्षिततेबद्दल ची ग्वाही दिली तसेच सर्व प्राध्यापक व प्राचार्यांचे कौतुक केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी याही उपस्थित होत्या या सभेचे नियोजन BBA BCA च्या सर्व प्राध्यापकांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियंका लांडगे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. रेश्मा शेख यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती