पुणे : अजित पवारांनी महात्मा फुले जयंतीनिमित्त फुले वाडा येथे महात्मा फुले यांच्या स्मृतींना अभिवादन केले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, फुले वाड्यात उत्तम स्मारक उभे करणार आहे. देशाला अभिमान वाटेल असे स्मारक केले जाणार आहे. मात्र स्मारकासाठी जागा सोडली पाहिजे. स्थानिक नागरिकांना पुनर्वसनासाठी अतिशय योग्य जागा दिली जाईल. काहींनी पुनर्वसनाला मान्यता दिली आहे. इतरांनीही जागा सोडावी असे आवाहन अजित पवारांनी आज केले.
महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून थांबवण्यात आले आहे. आज हा चित्रपत प्रदर्शित होणार होता, त्यावर अजित पवार म्हणाले की, चित्रपट प्रदर्शनासाठी आपल्याकडे सेंन्सॉर बोर्ड आहे. चित्रपटाचा समाजावर चांगला किंवा वाईट परिणाम होणार आहे का, याचा विचार सेन्सॉर बोर्डाकडून होतो. याआधीही काही चित्रपटांचे नाव बदलणे, दृष्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.सरकार म्हणून आम्हाला काळजी घ्यायची आहे की, समाजात तेढ निर्माण होणार नाही, एकोपा राहिल यासाठी आमचे प्रयत्न आहे, असेही अजित पवार म्हणाले.
फुले वाड्यात उत्तम स्मारक उभं करण्याचा निर्णय - अजित पवार अनेक महत्वाच्या गोष्टी एप्रिल महिन्यात आल्या आहे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देतो या स्मारकासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांचे मोठे योगदान फुले वाड्यात उत्तम स्मारक उभं करण्याचा निर्णय फुले यांनी जी मुलींची पहिली शाळा सुरू केली आहे ती जागा देखील महापालिकेच्या अखत्यारित आली आहे भोर आणि बारामतीचे काही प्रश्न मार्गी लाववी अशी शिवतारे यांची मागणी शिवतारे यांनी आयोजित केलेल्या सभेला आम्ही जाणार आहोत जागा वाटप लवकरच मार्गी लावू यासंदर्भात उद्या मुंबई मुख्यमंत्री फडणवीस आणि मी बैठक घेणार मनसेच्या नेत्यांशी चर्चा झाली त्यांचे म्हणणे आहे की राज ठाकरे यांचा निर्णय अंतिम असतो त्यामुळे मनसेचे नेते महायुतीचा प्रचार करतील