Apr 16 2025 01:53:25   सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 व्यक्ती विशेष

जय याचं झालं तर पार्थ पवारांचं कधी…? अजित पवारांनी मुलांच्या लग्नाबाबत केली मिश्किल टीप्पणी

डिजिटल पुणे    11-04-2025 17:38:24

पुणे : शिक्षणाची आणि महिला सबलीकरणाची ज्योत पेटवणारे जोतिबा फुले यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने पुण्यातील फुले वाडा येथे अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील फुले वाड्यामध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनी जोतिराव फुलेंची खास पगडी घातलेली देखील दिसून आली. त्याचबरोबर एकता मिसळमध्ये देखील अजित पवार यांनी सहभागी होत मिसळचा आस्वाद घेतला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्या लग्नाची देखील बात केली.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार यांनी पुण्यातील फुले वाड्याला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोतिराव फुले यांच्यावर आधारित ‘फुले’ या जीवनपट वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे. हिंदी भाषिक या चित्रपटातील काही चित्रिकरणावर समाजातील काही घटकांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत अजित पवार म्हणाले की, “सेन्सर बोर्डमध्ये वेगवेगळे मान्यवर आहेत. समाजावर काही परिणाम होणार आहे का? याची शहानिशा केली जाते. संविधानाने स्वातंत्र्य दिलं आहे, लोकं काहीही बोलतात. चित्रपटातून कुठेही तेढ निर्माण होणार नाही,” असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणावर प्रतिक्रिया दिली आहे. 26/11 दशशदवादी हल्ल्यामध्ये रेकी करणारा तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आले आहे. याबाबत अजित पवार म्हणाले की, “26/11 जेव्हा झालं तेव्हा आम्ही सुद्धा मुंबईत होतो. मास्टरमाईंड कोण आहे याची चौकशी करण्यासाठी खूप प्रयत्न झाले. आता तपास होईल की या माणसाने (राणा) नेमकं काय काय केलं होतं,” असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला होता.

एसटी कर्मचाऱ्यांबाबत तोडगा काढू

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. पण गेले अनेक महिने मागणी प्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना नक्त वेतन देण्यात येत असून या महिन्यात पुन्हा नक्त वेतन देण्याइतका सुद्धा निधी सरकार कडून आलेला नाही. याबाबत अजित पवार म्हणाले की, “कोरोना मध्ये 250, 300 कोटी रुपये एसटी यांना देतो. आता 50 टक्के तिकीट आता महिलांना सवलती दिल्या आहेत. प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की, काही उद्देश त्यांनी ठेवला आहे. इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेस घेण्याचं ठरवलं आहे. एक प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी पुढे आणायचा ठरवला आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसून तोडगा काढू,” असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा झाला आहे. जय पवार यांच्या साखरपुड्यानंतर आता पार्थ पवार यांचे लग्नामध्ये प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. अजित पवार म्हणाले की, “काय आहे ना जयचं लग्न त्यानंच ठरवलं. आता पार्थने ठरवलं की त्याचंही करु,” असे मिश्किल उत्तर अजित पवार यांनी दिले. यानंतर पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.


 Give Feedback



 जाहिराती