सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नाना पेठ येथील वाड्याला लागली भीषण आग,आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही .
 राज्य

हनुमान जयंतीनिमित्य अंजनेरी पर्वतावर जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; अनेक जण जखमी असल्याची माहिती

डिजिटल पुणे    12-04-2025 11:09:15

नाशिक : नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हनुमान जयंतीनिमित्य अंजनेरी पर्वतावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. यात 70 ते 80 भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. यात काही जण जखमी झाल्याचे सांगितलं जातंय. अंजनेरी पर्वतावर असलेल्या मंदिरात दरवर्षी राज्यभरातून आलेले भाविक दर्शनासाठी जात असतात. अशातच या भाविकांवर अचानक मधमाशांनी हल्ला चढवला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही काळ भाविकांची एकच धावपळ झाल्याचे बघायला मिळाले आहे.  

मधमाशांच्या या हल्ल्यात 70 ते 80 भाविक जखमी झाले असून जखमींचा आकडा मोठा असल्याचं प्रथमदर्शनींकडून सांगण्यात येत आहे. भाविक मंदिरात दर्शनासाठी जात असचाना अचानकत मधमाशांनी हल्ला केल्यामुळं तिथं काही कळायच्या आतच प्रचंड पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं.

हनुमान जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी मोठया संख्येनं भाविक अंजनेरी पर्वतावर येतात. यंदाच्या वर्षीसुद्धा या खास दिवसानिमित्त मंदिराबाहेरील परिसरामध्ये भाविकांची ये- जा पाहायला मिळाली. त्यातच मधमाशांच्या या हल्ल्यामुळं काही काळ या परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळालं होतं. इथं मधमाशा सैरावैरा उडू लागताच भाविकांनी लपून बसण्यासाठी आसरा शोधत काहींनी पळ काढला, तर काहींनी मिळेल त्या वस्तूनं चेहरा झाकण्याची धडपड केल्याचं पाहायाल मिळालं. जे भाविक या हल्ल्यात जखमी झाले त्यांना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं.

नाशिकमध्ये अनेक भाविकांची श्रद्धा असणाऱ्या अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंतीच्या निमित्तानं मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. इथं गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या हनुमान मंदिरात अपेक्षित गर्दी पहाटेपासूनच झाली. पहाटेच्या वेळी पूजाविधी संपन्न झाल्यानंतर पुढे इथे जन्मोत्सवही पार पडला. ज्यानंतर मारुतीरायाच्या मूर्तीवर आभूषणांचा साज करत यथासंग नैवेद्योपचार पार पडले. दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यानं उत्सवाला गालबोट लागलं असलं तरीही आता मात्र येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत आहे.

अंजनेरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटे विधिवत पूजा विधी करून हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी हनुमंतरायांच्या मूर्तीला विविध आभूषणे परिधान करण्यात आले आहे. मूर्तीला फेटा बांधून फुलांची आरास देखील करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईसह संपूर्ण मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. फळांचा भोग दाखवत महाआरती करण्यात आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती