सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नाना पेठ येथील वाड्याला लागली भीषण आग,आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही .
 शहर

पुण्यात आंबे खाण्याची अनोखी स्पर्धा! खास चिमुकल्यांसाठी मनसेकडून आयोजन

डिजिटल पुणे    12-04-2025 17:23:53

पुणे : फळांचा राजा अशी ओळख असलेला आणि उन्हाळ्यात लहानांपासून सर्वच व्यक्ती ज्या फळाची आतुरतेनं वाट पाहत असतात, त्या आंब्यांवर आज लहान चिमुकल्यांनी ताव मारला. दोन मिनिटांत प्लेटमध्ये असलेले सर्वच आंबे मुलांनी खाल्ले आणि "मीच पहिला.. मीच पहिला...", असा जल्लोष केला. निमित्त होते पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आयोजित "आंबे खा" स्पर्धेच....

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने "महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव" येथे लहान मुला-मुलींसाठी भारतातील लोकप्रिय "आंबे खा" स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी या स्पर्धेत जवळपास ३० हून अधिक मुलांनी सहभाग घेत आंब्यांवर ताव मारला. यावेळी आयोजक रवी सहाणे म्हणाले की, "गेल्या १६ वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने "आंबे खा" स्पर्धेच आयोजन केलं जात आहे. यात लहान मुलांना मनसोक्त आंबे खाण्याची स्पर्धा आयोजित केली जात आहे. यंदा देखील ३० हून अधिक मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी विजेता मुलाला आंब्याची पेटी बक्षीस देण्यात आली."

 दरम्यान, यावेळी या "आंबे खा" स्पर्धेत लहान मुलांनी आंबे बघून आनंदी होत आंब्यावर ताव मारला आणि दोन मिनिटाच्या आतच प्लेटमध्ये असलेले आंबे संपवले. तसेच, "आम्हाला खूपच जास्त आनंद होत आहे की आम्ही आज मनसोक्तपणे आंबे खाल्ले आहेत. या दिवसाची आम्ही खूप वाट बघत होतो", असं यावेळी या लहान मुलांनी सांगितलं.


 Give Feedback



 जाहिराती