सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 व्यक्ती विशेष

धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न; रणजित कासलेंच्या नव्या दाव्याने खळबळ

डिजिटल पुणे    15-04-2025 12:58:31

बीड:  गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि त्यासोबतच राजकीय घडामोडींमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी केलेल्या एका धक्कादायक खुलाशामुळे पु्न्हा एकदा खळबळ माजली आहे. त्यानंतर कासले यांनी पुन्हा एकदा नव्या व्हिडीओतून धक्कादायक खुसाला केला आहे. मंत्री धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नकोसा झाला होता. त्यासाठीच त्याचा एन्काऊंटर करण्याचा प्लॅन आखला गेला होता. असा दावा रणजित कासलेंनी केला आहे.

कासले यांनी एका नव्याने समोर आलेल्या व्हिडिओमधून दावा केला आहे की, मंत्री धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न केला होता. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या गुपिते उघड कऱण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांना संपवण्याचा डाव रचण्यात आल्याचा आरोप कासले यांनी केला आहे.  जर कराड जिवंत राहिला असता तर मुंडेंवर खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता होती, असंही कासलेंनी म्हटलं आहे.

रणजित कासले म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धनंजय मुंडेंना पाठिंबा आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील अनेक पुरावेही दाबल्याने धनंजय मुंडेंना या प्रकऱणात सहआरोपी केले जाणार नाही, असा दावा रणजित कासले यांनी केला. तसेच महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावे, असं खुले आव्हानही त्यांनी दिले आहे.यासोबतच कोणत्याही समाजाला दुखावण्याचा आपला हेतू नाही. पण बोलण्याच्या ओघात माझ्याकडून काही आक्षेपार्ह विधान झाले असेल तर मी माफ मागतो, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

दरम्यान वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतरही अनेक नेत्यांकडून त्याच्या एन्काऊंटर होण्यचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर थेट निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंनीदेखील असाच दावा केल्याने या प्रकरणाला आता नवे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी पोलिस विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा संदर्भ देत गंभीर आरोप केला होता.  त्यांनी सांगितले की, एखाद्या मोठ्या मासल्याला वाचवण्यासाठी छोट्या गुन्हेगाराचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे कराडचा एन्काऊंटर टाळावा, अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की, जर कराडचा एन्काऊंटर झाला, तर महत्त्वाचे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. वड्डेटीवार यांचा दावा आहे की, कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती त्यांना एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याकडून मिळाली आहे.

“मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी प्रस्ताव मिळाला होता” – रणजित कासले

निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी गंभीर आरोप करत दावा केला आहे की, त्यांना वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर देण्यात आली होती. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या एन्काऊंटरसाठी मोठ्या रकमेची – 10 ते 20 कोटी रुपयांची – एकरकमी ऑफर दिली जाते. ही रक्कम अधिक किंवा कमीही असू शकते, ती किती हवी आहे, हे विचारले जाते.  कासले म्हणाले, माझा या प्रकरणाशी थेट काही संबंध नव्हता,  मी सायबर गुन्हे शाखेत होतो. तरीसुद्धा माझ्यात ‘गट्स’ आहेत हे पाहून मला हा प्रस्ताव देण्यात आला. मात्र मी तो स्पष्टपणे नाकारला.

 


 Give Feedback



 जाहिराती