सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 विश्लेषण

गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी, 'ISIS काश्मीर' विरोधात टीम इंडियाच्या कोचने दाखल केली FIR

डिजिटल पुणे    24-04-2025 18:32:46

नवी दिल्ली  : देश सध्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने शोकसागरात बुडाला असताना, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ला ‘आयएसआयएस कश्मीर’ या दहशतवादी संघटनेकडून जीव मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर यांनी याबाबत दिल्ली पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली असून, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ही माहिती एएनआयने त्यांच्या कार्यालयाच्या हवाल्याने दिली आहे. 

गंभीरने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पीडित कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करत, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. देशभक्तीचे प्रतिक मानले जाणारे गंभीर हे पाकिस्तानविरोधी परखड मतांमुळे सतत चर्चेत असतात. पुलवामातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना त्यांनी आर्थिक मदत देखील केली आहे.

दरम्यान, माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाकडे आवाहन करत पाकिस्तानसोबत आयसीसी स्पर्धांमध्ये देखील सामना न खेळण्याची मागणी केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये झाला होता, जिथे भारताने विजय मिळवला होता. द्विपक्षीय मालिका मात्र 2012-13 नंतर बंद झाली आहे.

पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला

त्याचवेळी जम्मू-कश्मीरमधील अलीकडील दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी दौरा अर्धवट सोडून भारतात परत येत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माहिती दिली की भारताने पाकिस्तानसोबतची सिंधू जलसंधी तातडीने स्थगित केली असून, पाक नागरिकांचे भारतीय व्हिसाही रद्द करण्यात आले आहेत.

यापूर्वीही 2017 मध्ये ISIS कश्मीरने श्रीनगर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, ज्यात एक पोलीस शहीद झाला होता. ISJK संघटनेने काश्मीरमधील पाक समर्थित गटांनाही धमकावले होते.

 


 Give Feedback



 जाहिराती