डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक प्रवासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. श्री मोदी म्हणाले की, डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी इस्रोची अत्यंत परिश्रमाने सेवा केली आणि भारताचा अंतराळ कार्यक्रम नवीन उंचीवर नेला. "राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) तयार करताना आणि भारतातील शिक्षण अधिक समग्र आणि भविष्यवादी व्हावे यासाठी डॉ. कस्तुरीरंगन यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल भारत नेहमीच त्यांचा आभारी राहील. ते अनेक तरुण शास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी एक उत्कृष्ट मार्गदर्शक देखील होते", असे श्री मोदी पुढे म्हणाले.
"भारताच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक प्रवासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि राष्ट्रासाठी निस्वार्थी योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल.
त्यांनी इस्रोची खूप परिश्रमाने सेवा केली, भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नवीन उंचीवर नेले, ज्यासाठी आपल्याला जागतिक मान्यता देखील मिळाली. त्यांच्या नेतृत्वात महत्त्वाकांक्षी उपग्रह प्रक्षेपण देखील झाले आणि नवोपक्रमावर लक्ष केंद्रित केले."
"राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) तयार करताना आणि भारतातील शिक्षण अधिक समग्र आणि भविष्यवादी बनविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी भारत नेहमीच डॉ. कस्तुरीरंगन यांचे आभारी राहील. ते अनेक तरुण शास्त्रज्ञ आणि संशोधकांचे एक उत्कृष्ट मार्गदर्शक देखील होते.
माझ्या भावना त्यांच्या कुटुंबासोबत, विद्यार्थ्यांसोबत, शास्त्रज्ञांसोबत आणि असंख्य चाहत्यांसह आहेत. ओम शांती."