सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 शहर

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

डिजिटल पुणे    26-04-2025 10:48:33

पुणे : जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या पर्यटकांच्या कुटुंबियांची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. राज्यशासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा धीर त्यांनी दिला.यावेळी स्व. संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे, मुलगी आशावरी जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे, मुलगा कुणाल गणबोटे आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती