सोलापूर : महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने, जाहीर केलेल्या बांधकाम कामगार योजनेत, सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच खाजगी दलालांच्या मार्फत भ्रष्टाचार झाला व होत आहे., म्हणून सदर भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित दोशींवर कारवाई करावी., आणि खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून द्यावे., अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज), यांच्या शिष्टमंडळाद्वारे उपाध्यक्ष अंगद जाधव, सेक्रेटरी सोहेल शेख, सदस्य विनय बोड्ड् , महिला सदस्य रेखा आडकी, यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री श्री जयकुमार गोरे साहेब यांना देण्यात आले .
दि.२५ एप्रिल२०२५ रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब सोलापूर दौऱ्यावर आले असता, शासकीय विश्रामगृह येथे संघर्ष समितीच्या वतीने बांधकाम कामगारांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात बांधकाम कामगारांच्या विविध अडचणींचा व मागण्यांचा समावेश आहे. प्रामुख्याने या योजनेत होत असलेला भ्रष्टाचार हे स्वतः बांधकाम कामगारांना न्याय देणारे सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांचे बगलबच्चे करतात., ही अत्यंत गंभीर बाब आहे., म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त यांची ताबडतोब हकलपट्टी करून, चौकशी करा., अशी मागणी करून, बांधकाम कामगारांच्या १ ते ११ मागण्यांचा ही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अंगद जाधव, सोहेल शेख, विनय बोड्डू, रेखा आडकी उपस्थित होते. सदर प्रसंगी विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, शरणप्पा जगले, पप्पू शेख, राधिका मीठ्ठा, पद्मा मॅकल, सविता दासरी, महालक्ष्मी शेरला, नरसम्मा मालपुरी, लक्ष्मी गुंटला, यांचा समावेश होता.
महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या व भ्रष्टाचारी सहाय्यक कामगार आयुक्त यांची हकलपट्टी करा., अशा मागणीचे निवेदन पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देण्यात आले., सदर प्रसंगी विष्णू कारमपुरी (महाराज) अंगद जाधव, सोहेल शेख, विनय बोड्ड् ,व समितीचे पदाधिकारी दिसत आहेत.