सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 शहर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

डिजिटल पुणे    26-04-2025 15:42:02

पुणे :  पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दापोडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी  श्री. पवार यांनी नवीन इमारतीची पाहणी केली.यावेळी अधिकारी कक्ष, आवक जावक बारनिशी, सी.सी.टीव्हि, वायरलेस, डे-बुक, मुद्देमाल कारकून कक्ष,तपास पथक कक्ष, हिरकणी कक्ष, पुरुष व महिला विश्रांती कक्ष, खेळाचे मैदान, बैठक कक्ष, प्रसाधन गृह, आदी कक्षांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमाचे सादरीकरण दाखविण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या नवीन विकासकामांची माहिती देण्यात आली.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे,  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त श्रीमती स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती