सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 शहर

'पर्यावरणीय उत्तरदायित्व आणि शाश्वतता' विषयावरील राष्ट्रीय परिसंवादास चांगला प्रतिसाद

डिजिटल पुणे    26-04-2025 16:42:40

पुणे:  'पर्यावरणीय उत्तरदायित्व आणि शाश्वतता' या विषयावर आधारित राष्ट्रीय परिसंवाद दि.२६ एप्रिल २०२५ रोजी पुण्यात यशस्वीपणे पार पडला. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल बार असोसिएशन (पश्चिम विभाग खंडपीठ, पुणे) चे अध्यक्ष ॲड. सौरभ कुलकर्णी यांच्या वतीने हा  परिसंवाद  भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे  आयोजित करण्यात आला.या परिसंवादात पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (EIA), राष्ट्रीय हरित लवाद (NGT), तसेच सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक (CEPI) संदर्भात विविध पैलूंवर तज्ज्ञांनी विचार मांडले.या कार्यक्रमात पर्यावरणीय शासन आणि संवर्धन क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ व हितधारकांनी सहभाग घेतला.


राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे (NGT) तज्ज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी उद्घाटनपर भाषण केले. त्यांनी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (EIA) प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले आणि बदलत्या पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी ईआयएच्या आशयाचा सातत्याने विकास होणे आवश्यक असल्याचे नमूद केले, जेणेकरून प्रकल्प मूल्यांकन अधिक सखोल, व्यापक आणि भविष्यातील गरजांसाठी सक्षम राहील. 


पर्यावरणीय संवर्धन क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ.वाय.बी.सोनटक्के यांनी जलसंधारणाच्या अत्यावश्यकतेवर भर दिला. त्यांनी पाण्याचे जतन केल्याने पर्यावरणीय समतोल राखता येतो आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षितता सुनिश्चित करता येते, असे सांगितले. चर्चासत्राचे आयोजक  एड.सौरभ कुलकर्णी यांनी औद्योगिक समूहांमध्ये पर्यावरणीय गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक (CEPI) च्या महत्त्वावर प्रकाश टाकला. तसेच, सीईपीआय मूल्यमापनाद्वारे दुरुस्ती उपाययोजना निश्चित करण्यात व नियामक हस्तक्षेप साधण्यात मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.


या चर्चासत्राने पर्यावरणीय जबाबदारी मजबूत करण्याच्या उपाययोजनांवर व शाश्वत विकास पद्धतींना प्रोत्साहन देण्यावर सखोल संवादाची संधी दिली. कार्यक्रमाचा समारोप प्रश्नोत्तर सत्राने झाला, सहभागी सदस्यांनी हरित व शाश्वत भविष्यासाठी आपली बांधिलकी नव्याने दृढ केली.  


 Give Feedback



 जाहिराती