पुणे : जम्मू काश्मीरमध्ये दहशदवादी हल्ला करण्यात आला. पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे आक्रमक झालेल्या भारताकडून पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. केंद्र सरकारकडून कठोर पाऊले उचलली जात असून या संदर्भात केंद्रामध्ये सर्वपक्षीय बैठक देखील पार पडली आहे. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पुणे दौरा केला. यावेळी त्यांनी पुण्याचे आराध्य दैवत असलेल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. तसेच अभिषेक देखील केला. यावेळी भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण व्हावी असे मागणे जे पी नड्डा यांनी गणरायाकडे घातले.
यावेळी भाजपचे जे पी नड्डा यांनी भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण होवो… सर्वत्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहो… परराष्ट्र शक्तींचे निर्वाण होवो… देशबांधवांना सुस्थिती प्राप्त होवो… असा संकल्प करीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिषेक केला. यावेळी दहशतवादाविरोधी लढण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती प्रदान व्हावी, याकरिता गणरायाचरणी प्रार्थनाही केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे स्वागत व सन्मान मंदिरात करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी जे. पी. नड्डा यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील दिली.
यावेळी जे. पी. नड्डा म्हणाले, “आज गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आलो. दहशतवाद्यांनी पेहलगाम मध्ये जे कृत्य केले, त्याला याला सडेतोड उत्तर देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आमची अपेक्षा आहे. या संकटातून देश ताकतीने पुढे जाईल आणि जे यामागे दोषी आहेत, त्यांना योग्य उत्तर देण्याकरिता गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो. तसेच बुद्धी व शक्तीच्या माध्यमातून भारत या संकटकाळातून बाहेर येईल. याकरिता पंतप्रधान मोदी यांना शक्ती प्रदान होवो,” ही प्रार्थना त्यांनी यावेळी केली.