सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
 शहर

पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेवर,' वैशाली हॉटेलवरही पुणे महापालिकेची कारवाई; प्रकरण काय?

डिजिटल पुणे    08-05-2025 11:32:53

 पुणे : पुण्यातील प्रसिद्ध गुडकल कॅफेवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेकडून गुडलक कॅफेवरील अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. यादरम्यान गुडलक कॅफेजवळ मोठी गर्दी जमा झाली होती.  गुडलक कॅफे हे पुण्यातील प्रसिद्ध कॅफेंपैकी एक आहे. या कॅफेत तरुणवर्गाचा मोठा राप्ता असतो. महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने गुडलक कॅफेमध्ये येत असतात. मिळालेल्या माहितीनुसार, गुडलक कॅफेचा अर्धा भाग अनधिकृत असल्याने महापालिकेने हातोडा चालवला. गुडलक कॅफेला अर्धा भाग तोडण्यात आला आहे. 

 पुणे महापालिकेने  बुधवारी संध्याकाळपासून फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि डेक्कन परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली. या कारवाईत पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि गुडलक कॅफे  यांच्यावरही अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने हे अतिक्रमण हटवण्यात आले असून, संबंधित कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हॉटेल्स आणि दुकानांचे अतिक्रमण हटवले :

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने फर्ग्युसन रस्ता परिसरात अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आणि दुकानांनी पदपथ, सार्वजनिक रस्ता व्यापून केलेल्या बांधकामांवर कारवाई केली. विशेष म्हणजे हॉटेल वैशाली आणि गुडलक कॅफे यांचं सार्वजनिक रस्त्यावर वाढवलेलं बांधकाम हटवण्यात आलं.

या कारवाईमुळे बुधवारी संध्याकाळी या ठिकाणी आलेल्या ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. महापालिकेने आधीच संबंधित व्यावसायिकांना नोटीस बजावल्या होत्या, मात्र कारवाईसाठी वेळ न घेतल्याने थेट जेसीबीद्वारे अतिक्रमण हटवण्यात आलं.

पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सार्वजनिक ठिकाणांवर केलेल्या कोणत्याही अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई अनिवार्य आहे. प्रसिद्धता पाहून सूट दिली जाणार नाही. शहरात सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होतो आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे.”

या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, काही नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. तर काहींनी हॉटेल्सविरोधातील कारवाईमुळे पुरवठा सेवा आणि ग्राहकांना झालेल्या त्रासावर नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे हॉटेल वैशाली आणि गुडलक कॅफे हे पुण्याचे प्रतिष्ठित हॉटेल्स म्हणून ओळखले जातात.


 Give Feedback



 जाहिराती