Jul 11 2025 06:28:20   सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू

 DIGITAL PUNE NEWS

महाराष्ट्राच्या वेदांत आणि प्राची यांनी नेमबाजीत पटकावले सुवर्णपदक

डिजिटल पुणे    08-05-2025 15:42:45

नवी दिल्ली  : महाराष्ट्राच्या युवा नेमबाजांनी खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 मध्ये आपल्या अचूक नेमबाजीने सुवर्णपदकांवर नाव कोरले. बिहार येथे आयोजित शूटिंग स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वेदांत नितिन याने 50 मीटर थ्री पोजीशन्स राइफल (पुरुष युवा वर्ग) मध्ये 452.5 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. त्याने हरियाणाच्या रोहित कन्यन (451.9) आणि पंजाबच्या अमितोज सिंह (440.1) यांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले.

दुसरीकडे, नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंज येथे दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या 17 वर्षीय प्राची गायकवाड हिने 50 मीटर राइफल थ्री पोजीशन (युवा महिला वर्ग) मध्ये 458.4 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. प्राचीने स्थिरता आणि आत्मविश्वास दाखवत सर्वांचे लक्ष वेधले. मुंबईत अरुण वारेसी, बिबास्वान गांगुली आणि शुभम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या प्राचीला तिचे वडील शशिकांत गायकवाड यांच्या प्रोत्साहनामुळे नेमबाजीची आवड निर्माण झाली.

 Give Feedback

 जाहिराती