सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
 विश्लेषण

भारतीय महिला पायलटला पकडल्याचा पाकिस्तान दावा; पीआयबीकडून दाव्याचे खंडण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला

डिजिटल पुणे    10-05-2025 14:34:21

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमावर्ती तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून विविध अफवा आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. सोशल मीडियावर काही पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या आहेत, ज्यामध्ये भारताचे फायटर जेट क्रॅश झाले, भारतीय महिला पायलट पाकिस्तानच्या  ताब्यात आहे, तसेच भारताचा एस-400 डिफेन्स सिस्टम पाकिस्तानने उद्ध्वस्त केला असल्याचे दावे करण्यात आले. पीआयबीने हे वृत्त फेक असल्याचं सिद्ध केलं आहे.  भारतीय महिला हवाई दलाच्या पायलट स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंग यांना पकडल्याचा दावा पाकिस्तानी समर्थक सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आला होता. मात्र कोणत्याही भारतीय महिला हवाई दलाच्या पायलटला किंवा कोणत्याही सैनिकाला पकडण्यात आलेले नाही, असं पीआयबीने म्हटलं आहे. 

पहिला दावा

पहिला दावा होता की, पाकिस्तानने भारताच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टिमवर हल्ला केला आणि ती प्रणाली नष्ट केली. सोशल मीडियावर या संदर्भात अनेक पोस्ट्स व्हायरल झाल्या. परंतु पीआयबीने स्पष्ट केले की, हा दावा पूर्णपणे खोटा असून एस-400 सिस्टिम सुरक्षित आहे. कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला नाही आणि यासंदर्भात कोणताही पुरावा उपलब्ध नाही.

दुसरा दावा

दुसरा दावा होता की, भारतीय वायुसेनेचे काही फायटर जेट्स नुकतेच क्रॅश झाले आहेत. या अफवेमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले. परंतु पीआयबीने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, अशा कोणत्याही दुर्घटनेची नोंद नाही आणि ही माहिती तथ्यहीन आहे.

तिसरा दावा – शिवांगी सिंह सुरक्षित

तिसरा आणि सर्वाधिक संवेदनशील दावा असा करण्यात आला की, भारतीय महिला फायटर पायलट शिवांगी सिंह पाकिस्तानकडून पकडण्यात आल्या आहेत. हा दावा विशेषतः पाकिस्तानसमर्थक सोशल मीडिया खात्यांवरून पसरवण्यात आला होता. मात्र पीआयबीने या दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले की, स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंह पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यांच्याबाबत कोणतीही अनिष्ट घटना घडलेली नाही.

या तिन्ही दाव्यांवरून स्पष्ट होते की, पाकिस्तान आता फक्त सैनिकी पातळीवर नव्हे, तर माहितीच्या माध्यमातून देखील भारताविरोधात मानसिक युद्ध छेडण्याचा प्रयत्न करत आहे. खोट्या बातम्यांच्या आधारे जनमत गोंधळवण्याचा हा प्रयत्न भारतीय यंत्रणांनी वेळेत हाणून पाडला आहे. पीआयबी च्या या स्पष्टीकरणामुळे देशातील नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांकडे योग्य तथ्य तपासणीशिवाय विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती