पुणे : शिक्षण शास्त्र विभागातील काही परदेशी विद्यार्थ्यांनी बौद्ध मूर्ती विद्यापीठात सहा फूट उंचीची भेट देण्यात आली होती. विद्यापीठातील काही पाकिस्तानी विचाराचे असल्याने दिनांक 8 मे रोजी कोणालाही न सांगता रात्रीच्या वेळेस हलवण्यात आली. गौतम बुद्धांचे विचार मानवता शिकवते पशु, किडे, झाडे यांच्यावरती प्रेम करावे असे त्यांचे विचार असल्याने बुद्धांची प्रेरणा घेऊन 14 ऑक्टोंबर 1956 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यामुळे बौद्ध धर्म भारताला समजला त्यामुळे हे भारतीयांचे श्रद्धास्थान असून बौद्ध विचारांना कुठेतरी ठेस पोचवण्याचे काम विद्यापीठामध्ये काही कर्मचारी हे पाकिस्तानचे विचाराचे असून त्यांची वृत्ती ही अत्याचार अन्याय करणारी असून आम्ही बौद्ध समाज किंवा बुद्धांना मानणारे इतर समाजातील लोक हे खपून घेणार नाही. असे वक्तव्य आम आदमी पार्टी, पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग यांनी व्यक्त केले. आम आदमी पार्टीचे सिस्ट मंडळ शहराध्यक्ष सदस्यांची जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ कुलगुरू यांना दिनांक 15 मे रोजी भेटणार आहे.