सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
 विश्लेषण

भारताच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये मसूद अझरच्या दोन्ही मेहुण्यांसह 5 बड्या दहशवाद्यांचा खात्मा, सर्वांची नावं समोर!

डिजिटल पुणे    10-05-2025 15:43:54

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये  22 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारताच्या २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. तसेच या हल्ल्याचा बदल घ्यावा अशी मागणी भारतातील नागरिकांकडून केली जात होती.या हल्ल्यानंतर १५ व्या दिवशी भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे  एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात पाकिस्तानचे अनेक दहशतवादी ठार झाले होते. त्यानंतर आता या हल्ल्यात पाच मोठे दहशतवादी मारले गेले असून, त्यांची नावे समोर आली आहेत. यामध्ये जैश प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा मेहुणा आणि भावाचा समावेश आहे.

22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 26 पर्यटकांचा दूर्देवी मृत्यू झाला. याच हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताकडून 7 मे च्या मध्यरात्री ऑपरेश सिंदूर लॉन्च करण्यात आले. या ऑपरेशन सिंदूरमधून भारतीय वायूदलाने अवघ्या 25 मिनिटांत क्षेपणास्त्रांचा मारा करुन पाकिस्तानची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. याच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने मारलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांची नावे उघड झाली आहेत. लष्कराच्या हल्ल्यात ५ मोठे दहशतवादी मारले गेले.

यामध्ये मुदस्सर खादियान, खालिद, हाफिज जमील, युसूफ अझहर आणि हसन खान यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच भारताच्या हल्ल्यात मसूद अझहरचा मेहुणा आणि मेहुणीही मारले गेले. पाकिस्तानकडून मिळालेल्या अहवालानुसार, ऑपरेशन सिंदूर स्ट्राइकमध्ये ५ मोठे दहशतवादी मारले गेले. या सर्व दहशतवाद्यांचा लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी थेट संबंध होता. हे सर्व दहशतवादी लष्कर आणि जैशशी संबंधित होते. जो हाफिज सईद आणि मसूद अझहरच्या सूचनेवरून दहशतवादी हल्ले करत असे.

ठार झालेल्या प्रत्येक दहशतवाद्याची संपूर्ण कुंडली

१. मुदस्सर खडीयन खास ऊर्फ अबू जुनदल (लष्कर-ए-तैयबा) 

मुरिदके येथील 'मर्कज तैयबा'चा प्रमुख असलेला मुदस्सर हा पाक लष्कराचा अत्यंत जवळचा होता. त्याच्या अंत्यविधीला पाक सैन्याने गार्ड ऑफ ऑनर दिला होता. पाक लष्करप्रमुख आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले होते. जमात-उद-दवाच्या (JuD) हाफिज अब्दुल रऊफने अंत्यप्रार्थना घेतली. कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिस आयजी उपस्थित होते.

२. हाफिज मोहम्मद जमिल (जैश-ए-मोहम्मद)

जैश प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा मोठा मेहुणा असलेला हाफिज जमिल बहावलपूरमधील 'मर्कज सुब्हान अल्लाह'चा प्रमुख होता. तो युवकांच्या धर्मांधतेसाठी कट्टर प्रचार करत होता आणि जैशसाठी निधी गोळा करण्यात सक्रिय होता.

३. मोहम्मद युसूफ अझहर ऊर्फ उस्ताद जी (जैश-ए-मोहम्मद)

मौलाना मसूद अझहर याचा दुसरा मेहुणा असलेल्या युसूफ याचा वापर जैशच्या शस्त्र प्रशिक्षणासाठी होत असे. जम्मू-काश्मीरमध्ये त्याने अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. तो IC-814 विमान अपहरण प्रकरणात वॉन्टेड होता.

४. खालिद ऊर्फ अबू अकाशा (लष्कर-ए-तैयबा)

खालिद हा जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. तो अफगाणिस्तानातून शस्त्रांची तस्करी करीत असे. त्याच्या फैसलाबादमध्ये झालेल्या अंत्यविधीला पाक लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते.

५. मोहम्मद हसन खान (जैश-ए-मोहम्मद)

पाकव्याप्त काश्मीरमधील जैशच्या ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मीरी याचा मुलगा मोहम्मद हसन जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचे समन्वयक म्हणून काम करत होता.

या कारवाईनंतर पाकिस्तानमधील लष्कर आणि प्रशासनाच्या समर्थनाने चालणाऱ्या दहशतवाद्यांच्या वास्तव्यावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. भारताच्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या दुटप्पीपणा उघडा पडला आहे.


 Give Feedback



 जाहिराती