सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
 विश्लेषण

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतला मोठा निर्णय, आता जर दहशतवादी हल्ला झाला तर…युद्धाची कृती समजली जाणार

डिजिटल पुणे    10-05-2025 17:12:43

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. गेल्या सलग दोन रात्री पाकिस्तानने ड्रोनने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारताने हवेतच हाणून पाडण्यात आला. याचपार्श्वभूमीवर भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी सूत्रांनुसार आता जर भारताविरुद्ध दहशतवादी हल्ला झाला तर तो युद्ध मानला जाईल आणि त्यानुसार त्याला प्रत्युत्तर दिले जाईल.

सरकारच्या निर्णयामुळे हे स्पष्ट झाले आहे की, भारत यापुढे पाकिस्तानकडून होणारे दहशतवादी हल्ले सहन करणार नाही. जर पाकिस्तानने अजूनही दहशतवादी हल्ले थांबवले नाहीत तर भारत ते युद्ध मानेल आणि त्यावर कडक कारवाई करेल. २२ एप्रिल रोजी, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाची आघाडी संघटना टीआरएफने पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला. यामध्ये २६ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण जखमी झाले. यामध्ये, भारतीय पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर गोळ्या घालण्यात आल्या, ज्यामुळे देशभरात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला.दहशतावाद्यांचे तळ उद्धवस्त केले मात्र लष्करावर हल्ला केलेला नव्हता. मात्र, यापुढं दहशतवादी हल्ला झाल्यास भारताकडून लष्कर-ए- तोयबा असेल किंवा  पाकिस्तानच्या लष्काराला ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल. भारतानं दहशतवादी हल्ल्याला युद्धजन्य कृती समजून उत्तर देऊ असं म्हटलं आहे. 

निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी भारत सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. दहशतवादी कृत्य हे देशाविरुद्ध कृती मानलं जातं. देशाविरुद्ध कृती म्हणजे युद्धजन्य कृती असते. भारतानं हा निर्णय घेतला आहे हा  यापूर्वी व्हायला होता. आता निर्णय घेतला असेल तर ठीक आहे. आता शत्रू राष्ट्राकडून किंवा दहशतवाद्यांकडून काही कृती झाल्यास युद्ध सुरु झाल्याचं समजून उत्तर जाईल. 

भारताच्या भूमीवर दहशतवादी कृत्य होईल तेव्हा ती देशाविरुद्ध कृती समजून उत्तर दिलं जाईल, असं अनिल बाम म्हणाले.  भारतानं हे धोरण स्वीकारल्यानंतर इतर देश काय बोलतात याकडे लक्ष देऊ नये. दहशतवादाचा सामना भारताला करावा लागत आहे. भारत कोणत्याही राष्ट्राच्या प्रतिक्रियेला उत्तर देण्यासाठी सक्षम आहे, असं अनिल बाम म्हणाले. भारत सरकारच्या उच्च पदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्ध कारवाई मानला जाईल आणि त्यानुसार उत्तर दिलं जाईल. भारत यापुढं दहशतवादी हल्ला युद्धाची कृती समजून उत्तर देईल.  

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची आणि संरक्षण दलाची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. भारताकडून वारंवार पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर आणला जात आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूरद्वारे कारवाई केल्यानंतर पाकिस्तान बिथरला असून त्यांच्याकडून ड्रोन, मिसाईल हल्ले करण्यात येत आहेत. मात्र, भारताच्या संरक्षण दलांकडून पाकचे हल्ले नाकाम केले जात आहेत. 

दरम्यान भारताचे फारसे नुकसान झाले नाही आणि हवाई संरक्षण यंत्रणेने आकाशातच हे हल्ले उधळून लावले, अशी माहिती मिळत आहे. यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा पाकिस्तानने भारतातील २६ शहरांवर ड्रोन हल्ले केले. हे देखील उधळून लावण्यात आले. पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. काल रात्री भारतानेही सहा पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले.


 Give Feedback



 जाहिराती