सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
 विश्लेषण

भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

डिजिटल पुणे    10-05-2025 18:19:12

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान याा आशियातील दोन देशांमध्ये युद्ध सुरु असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रप्म यांनी मोठा दावा केला आहे. "भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे", असं डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलं आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दोन्ही देशांमधील दीर्घ चर्चेनंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे.

भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. हा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'अमेरिकेच्या मध्यस्थीखाली काल रात्री झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे कळवताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने हल्ले तात्काळ आणि पूर्णपणे थांबवण्यास सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांनी समंजस निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.

"अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मी आनंदाने जाहीर करतो की भारत आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांचा सामंजस्यपणा  आणि प्रसंगावधानासाठी अभिनंदन! या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त करत प्रत्युत्तर दिलं. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात असताना, भारताने मात्र ते परतून लावले आहेत. मात्र आता भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याला दुजोरा दिला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

"अमेरिकेने मध्यस्थी केल्याने रात्रभर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कॉमन सेन्स आणि आपल्या हुशारीचा वापर केल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद," असं डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची पोस्ट

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनीही पोस्ट शेअर करत याला दुजोरा दिला आहे. "पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता पाकिस्तानने नेहमीच या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

भारत आणि पाकिस्तानमधील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत दोन्ही देशांनी थेट चर्चा केली. पाकिस्तानच्या डीजीएमओने आज दुपारी फोन सुरू केला, त्यानंतर चर्चा झाली आणि समझोता झाला. इतर कोणत्याही ठिकाणी इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मिसरी यांनी दिली आहे. 


 Give Feedback



 जाहिराती