Jul 14 2025 23:02:19   सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू

 शहर

पुणे रेल्वे स्थानका वर येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास... सुरक्षा देखील रामभरोसे – संदीप खर्डेकर

डिजिटल पुणे    12-05-2025 11:35:12

पुणे : पुण्यातील रेल्वे स्टेशन बाहेर झालेल्या वाहनांच्या गर्दीमुळे निर्माण झालेल्या समस्येवर भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी प्रकाशझोत टाकला आहे. रेल्वेने प्रवास करताना त्यांना हा अनुभव आला आहे. याबाबत त्यांनी पुण्याचे मंडल रेल प्रबंधक, ( डी आर एम ) राजेश वर्मा आणि पोलीस आयुक्त, अमितेश कुमार यांचेशी लेखी पत्रव्यवहार करून याप्रश्नी लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात  मंगळवार 6 मे नागपूर येथून प्रवास करून सकाळी 10 वाजता पुण्यात रेल्वे स्थानकात आल्यावर आलेले अनुभव आपल्या निदर्शनास आणू इच्छितो.

1) रेल्वे स्थानकाच्या आवारात ( प्लॅटफॉर्म व पोर्च सह ) प्रचंड गर्दी होती व या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित वाटावे असे परिस्थिती नव्हती. चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती दिसून आली.

2) आवारात प्रचंड वाहतूक कोंडी होती व सर्वत्र रिक्षा व टॅक्सी वाल्यांचे राज्य दिसून आले. पिक अप व ड्रॉप साठी आलेली वाहने ह्या कोंडीत अडकून पडली होती.

3) प्लॅटफॉर्म वर प्रवेश करताना व बाहेर येताना दोन छोटे दरवाजे उघडलेले होते व मुख्य दरवाजा बंद होता त्यामुळे आत येणारे व बाहेर जाणाऱ्यांची गर्दी व धक्काबुक्की सुरु होती.तसेच आत जाताना स्कॅनर वर बॅग तपासणी देखील केली जात नव्हती. येथील मुख्य दरवाजा बंद करून साईड च्या दोन छोट्या दरवाज्यातून नागरिकांना ये जां करण्यास सांगण्याचा हेतू समजला नाही.

तरी ह्या निवेदनाद्वारे आपणास अशी मागणी करतो की ह्या परिस्थितीत त्वरित सुधारणा व्हावी व प्रवाश्यांना दिलासा मिळावा !!

( आज देखील माहिती घेतली असता अशीच परिस्थिती असल्याचे नागरिकांनी सांगितले ) असेही त्यांनी म्हटले आहे.

 Give Feedback

 जाहिराती