सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
 जिल्हा

औषध व्यवस्थेसाठी ‘गट ऑफ फ्रेंड्स’ (जीएफटीएम) ची सहावी बैठक जिनिव्हामध्ये संपन्न

डिजिटल पुणे    12-05-2025 11:41:17

मुंबई : आयुष सचिवांनी जागतिक आरोग्यात पारंपरिक वैद्यकशास्त्राच्या भूमिकेवर प्रकाश टाकला, पारंपरिक औषधांच्या वैज्ञानिक आधारावर आधारित प्रचारासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार पारंपरिक औषध व्यवस्थेसाठी ‘गट ऑफ फ्रेंड्स’ (जीएफटीएम) यांची सहावी बैठक 9 मे 2025 रोजी जिनिव्हामधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी कार्यालयात (पीएमआय) यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत पारंपरिक औषध व्यवस्था जागतिक आरोग्य व्यवस्थांमध्ये बळकट करण्यास कटिबद्ध असलेल्या विविध देशांच्या राजदूतांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

गुजरात जाहीरनाम्यावर आधारित आणि याआधीच्या यशस्वी बैठका लक्षात घेता, या बैठकीद्वारे महत्त्वाच्या जागतिक उपक्रमांना पाठिंबा दर्शविण्यात आला.विशेषतः जागतिक आरोग्य संघटनेची पारंपरिक औषध धोरण (2025–2034) आणि भारतात 2 ते 4 डिसेंबर 2025 दरम्यान होणारी दुसरी जागतिक पारंपरिक औषध परिषद यांचा यात समावेश होतो.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी या बैठकीत ऑनलाईन माध्यमातून मुख्य भाषण केले, ज्यामध्ये भारताचे जागतिक स्तरावरील नेतृत्व आणि वैज्ञानिक आधारावर आधारित पारंपरिक औषध प्रचारासाठी आपली वचनबद्धता अधोरेखित केली.

आपल्या भाषणात त्यांनी पारंपरिक औषधांचे सार्वत्रिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यामधील वाढते महत्त्व, "वन हेल्थ" आणि शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) साध्य करण्यासाठी याचे योगदान स्पष्ट केले.

आयुष मंत्रालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आयुष अभियान, आयुष आरोग्य मंदिरांचे समाकलित प्रतिमान , पारंपरिक औषधांसाठी विमा संरक्षण, तसेच डीबीटी, डीएसटी, आयसीएमआर आणि सीएसआयआर यांसारख्या प्रमुख संस्थांबरोबरच्या सहयोगी संशोधनाचा त्यांनी उल्लेख केला.त्यांच्या भाषणात भारत पारंपरिक औषध व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), जीनोमिक्स आणि बायोइन्फॉर्मेटिक्स यांसारख्या नव्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा देखील उल्लेख केला गेला. याचे एक उदाहरण म्हणजे पारंपरिक औषधांमध्ये एआयचा वापर यावरील जागतिक तांत्रिक बैठक होय.ज्यामध्ये पारंपरिक ज्ञानाचे जतन, क्षमतेचा विकास आणि समता आधारित जागतिक आरोग्य व्यवस्था यावर भारताचा भर अधोरेखित झाला.

"गट ऑफ फ्रेंड्स ऑफ ट्रेडिशनल मेडिसिन (जीएफटीएम)" भारताने मे 2023 मध्ये स्थापन केला होता. या अनौपचारिक मंचाद्वारे जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य देश पारंपरिक औषध व्यवस्थेचा आरोग्य सेवांमध्ये समावेश याविषयी चर्चा व समर्थन करू शकतात, असे सचिव म्हणाले. त्यांनी सर्वांना अधिक सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण आणि संशोधन भागीदारीसाठी आवाहन केले.

या बैठकीचे यजमान असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघामधील भारताच्या जिनिव्हास्थित स्थायी प्रतिनिधी कार्यालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आणि राष्ट्रीय धोरणांच्या अनुरूप पारंपरिक व समाकलित आरोग्य उपायांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्याचा आपला संकल्प पुन्हा व्यक्त केला.

जीएफटीएमसारख्या मंचांद्वारे आणि आयुष मंत्रालयाच्या नेतृत्वात, भारत आपल्या पारंपरिक आरोग्य वारशाचे जतन करत असून जागतिक आरोग्याच्या भविष्यासाठी एक समावेशक, प्रतिबंधात्मक व निसर्गाच्या ज्ञानावर आधारित आराखडा साकारत आहे.

यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, ‘गट ऑफ फ्रेंड्स ऑफ ट्रेडिशनल मेडिसिन’ (जीएफटीएम) 23 मे 2025 रोजी जिनिव्हामधील युनायटेड नेशन्सच्या पाले डेस नेशन्स येथे सायंकाळी 6:00 ते 7:30 दरम्यान जागतिक आरोग्य असेंब्लीच्या (डब्ल्यूएचए78) 78व्या सत्राच्या पार्श्वभूमीवर एक उच्चस्तरीय उपक्रम आयोजित करणार आहे. “पारंपरिक औषध : पारंपरिक वारशापासून वैज्ञानिक सीमारेषेपर्यंत, सर्वांच्या आरोग्यासाठी” या शीर्षकाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात पारंपरिक, पूरक व समाकलित औषध व्यवस्थेचा सार्वत्रिक आरोग्य सेवा व शाश्वत विकास आराखड्यात समावेश करण्याच्या वाढत्या जागतिक चळवळीवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती