पुणे : पक्का पाया प्रकाशन पुणे, या संस्थेच्या वतीने श्रीमद् भगवद्गीता या विषयावर सादरीकरण कार्यक्रम आणि नवीन ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त गीताधर्म मंडळ, सदाशिव पेठ, पुणे येथे दि.15 जून 2027 रोजी संध्याकाळी 4.30 वाजता गीता या विषयावर लेखक शैलेंद्र लक्ष्मीकांत देशपांडे यांचे १ तासाचे सादरीकरण होत असून, प्रकाशनपूर्व ग्रंथ नोंदणीचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आगाऊ नोंदणी करणारांची १००१ रुपये किमतीचा ग्रंथ ६०० रुपयांत मिळणार आहे. तसेच आध्यात्मिक अभ्यासासाठी त्रिस्तरीय ऑनलाईन मोफत प्रमाणपत्र परीक्षा देखिल होणार आहे. अधिक माहिती साठी 9850180089 या क्रमांकावर संपर्क साधावा