Aug 14 2025 02:34:54   सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणपतीपुळे महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून वेशभूषेसंदर्भात व नव्या ड्रेसकोड प्रणालीसंदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे, आता भाविकांना पूर्ण पोशाख परिधान करुनच मंदिरात यावे लागेल.
  • बीएमटीसी बस सेवा देणाऱ्या कामगारांना 40 वर्षानंतर न्याय मिळणार; सिडकोच्या माध्यमातून आर्थिक मोबदला दिला जाणार
  • लातूर जिल्ह्यातील लामजण्यात श्रावण सोमवारी गोवंश हत्या; अटकेतील तिघांना तीन दिवसाची पोलिस कोठडी
  • ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका; मराठा बांधव आणि छावा संघटनेचे पदाधिकारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
  • पगार थकले म्हणून ट्रॉमा केअर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप; रुग्णसेवेत अडथळा
  • कबुतरखाना येथे मराठी एकीकरण समितीच्या वतीने आज आंदोलन; परिसराला छावणीचे स्वरुप

 व्यक्ती विशेष

आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणा संदर्भात दिव्यांगांचा उरण तहसील कार्यालयावर मूक मोर्चा

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    14-06-2025 13:01:28

उरण : दिव्यांग आणि शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी धावणारा एकमेव नेता माजी आमदार बच्चू कडू  यांच्या अन्नत्याग उपोषणाला उरण तालुक्यातील दिव्यांग संघटनेने तहसील कार्यालयावर १३ जून २०२५ रोजी मूक मोर्चा काढून जाहीर पाठिंबा दर्शवत मूक मोर्चा काढला.प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व दिव्यांगाचे आधारस्तंभ माजी आमदार बच्चू कडू  हे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि इतर समाज घटकांच्या विविध मागण्यांकरीता अमरावती येधील गुरुकुंज मोझारी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी जवळ अन्नत्याग आंदोलनास रविवार दि ०८ जून २०२५ रोजी पासून बसले आहेत. त्यांच्या आंदोलनास उरण तालुक्यातील दिव्यांग सामाजिक संघटना  व  दिव्यांग बांधवांतर्फे जाहिर पाठिंबा दर्शविण्याकरिता उरण मध्ये मूक मोर्चा काढण्यात आला.

तहसीलदार उद्धव कदम यांना सदर निवेदन देत असताना दिव्यांग सामाजिक संघटना उरणच्या सदस्यांनी असे सांगितले की उरण तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांचा  अन्नत्याग उपोषणाला  पाठिंबा तर आहेच. सरकारने लवकरात लवकर  विविध मागण्यासंदर्भात मा. बच्चू कडू साहेबांनं सोबत चर्चा व्हावी त्या करीता सरकार दरबारी आपण आमची मागणी आपल्या माध्यमातून पोहचवावी. तसेच जर यापुढे सदर मागण्या संदर्भात अनुकूल चर्चा नाही झाली तर उरण तालुक्यातील तमाम दिव्यांग बांधव उपोषणाला बसतील. बच्चू कडू साहेब हे शेतकरी आणि दिव्यांगांसाठी अन्नत्याग  उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आम्ही सध्या मूक मोर्चा काढत आपल्यासमोर आलो आहोत असे दिव्यांग बांधवांनी म्हटले आहे. आणि त्या संदर्भात तसीलदार उद्धव कदम यांना निवेदनही देण्यात आले. याप्रसंगी दिव्यांग सामाजिक संस्थेचे सर्व शिलेदार उपस्थित तर होतेच त्याचबरोबर उरण तालुक्यातील इतर सामाजिक संघटनेचे सदस्य ही उपस्थित होते.

 Give Feedback

 जाहिराती