सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 DIGITAL PUNE NEWS

बाबुरावजी घोलप महाविद्यालयात उद्यापासून रंगणार बुद्धिबळ स्पर्धेचा थरार

डिजिटल पुणे    23-06-2025 14:10:02

पुणे : सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयात उद्यापासून 24 ते 29 जून दरम्यान भव्य तिसर्‍या यु इन स्पोर्ट आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए.एम. जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप, यु इन स्पोर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोशन कुमार इंगोले आदी मान्यवर प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, सहाय्यक सचिव राजेंद्र कोंडे, समन्वयक डॉ. विद्या पठारे, संघटनेच्या वतीने मा. प्रवीण ठाकरे, यु इन स्पोर्ट्स कडून योगेश रवादळे, मृणाल पाठक हे देखील यावेळी उपस्थित असणार आहेत.


पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून बाबुरावजी घोलप महाविद्यालय हे पिंपरी - चिंचवड परिसरातील कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र, बी.बी.ए.सी.ए. तसेच फॅशन टेक्नॉलॉजी,  सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम, रिटेल मॅनेजमेंट व ब्युटी थेरपी मध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणारे प्रथितयश महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच अनेक शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रम राबवण्यामध्ये महाविद्यालय आघाडीवर असून या स्पर्धेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या स्पर्धेत राज्य, राष्ट्रीय व  आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धा गाजवणारे सुमारे 150 पेक्षा जास्त विद्यार्थी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवणार आहेत.सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती