सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

शांतिदूत परिवाराचा सहावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

गजानन मेनकुदळे    27-06-2025 10:30:25

पुणे : शांतिदूत परिवाराचा सहावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भव्य असे रक्तदान शिबिर ,अवयव जनजागृती शिबिर तसेच राजयोग ध्यान शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध  क्षेत्रातील प्रतिष्ठित व नामांकित व्यक्तींना शांतिदूत  सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी साहित्य क्षेत्रातील कला क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रसिद्ध उद्योजक रामदास माने तर प्रमुख पाहुणे म्हणून संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह. भ. प .प्रशांत महाराज मोरे, विठ्ठल जाधव,पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील , अप्पर आयुक्त जीएसटी शिवकुमार साळुंखे ,गजल नवाज भीमराव पांचाळे , पुणे पोलीस पोलीस उपायुक्त निखील पिंगळे,प्राचार्य रामदास चवरे, ब्रह्मकुमारी आशा दीदी, प्रा.गुणवंतराव जाधवर, राजेश सूर्यवंशी ,मंदार पाटील व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती