सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 जिल्हा

राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक; पुण्यात काय स्थिती?

डिजिटल पुणे    03-07-2025 15:27:40

पुणे : राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक असून सर्वाधिक कुपोषित बालक मुंबई उपनगरात असल्याची माहिती समोर आली आहे. तर मुंबईच्या तुलनेत पुण्यातील कुपोषित बालकांची पुण्यातील संख्या कमी असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात तब्बल १ लाख ८२ हजार ४४३ बालके कुपोषित असल्याची आकडेवारी सरकारने जारी केली आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये कुपोषणाच्या आकडेवारीत वाढ झाल्याची माहिती सरकारने दिली आहे.  पुण्यातही कुपोषित बालकांची संख्या चिंताजनक असल्याचं चित्र आहे. 

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये कुपोषणाच्या आकडेवारीत वाढ झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. मुंबई उपनगरमध्ये १६ हजार ३४४ कुपोषित बालके आहेत. त्यात, मध्यम कुपोषित बालकांची संख्या १३, ४५७ तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या २८८७ एवढी आहे. 

राज्यामध्ये मध्यम कुपोषित बालकांची संख्या १ लाख ५१ हजार ६४३  असून तीव्र कुपोषित बालकांची संख्या 30,800 एवढी आहे. मुंबई उपनगराच्या पाठोपाठ नाशिक जिल्ह्यामध्ये कुपोषणाची  संख्या वाढली. नाशिक मध्ये 9 हजार ८५२ कुपोषित बालकांची संख्या असून यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या 8,944 तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या १८५२ एवढी आहे.

मुंबईच्या तुलनेत पुण्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी

ठाणे जिल्ह्यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या ७,३६६आणि तीव्र कुपोषित बालकांची संख्या 844 एवढी आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यातील कुपोषित बालकांची पुण्यातील संख्या कमी आहे. पुण्यात मध्यम कुपोषित बालके ७,४१० तर तीव्र कुपोषित बालके १६६६ एवढी आहेत. 

धुळे जिल्हा मध्यम कुपोषित बालके ६,३७७ आणि तीव्र कुपोषित बालके १७४१ आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्हा मध्यम कुपोषित बालके ६४८७ तर तीव्र कुपोषित बालके १४३९ आहेत. नागपूर मध्यम कुपोषित बालके ६,७१५ तर तीव्र कुपोषित बालके १३७३ इतकी आहेत.


 Give Feedback



 जाहिराती