सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 राज्य

काटोल, नरखेड आणि मोवाड शहरातील पाणी पुरवठा योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

डिजिटल पुणे    11-07-2025 13:55:06

मुंबई  : काटोल, नरखेड आणि मोवाड शहरांतील नागरिकांना नियमित पाणी मिळावे यासाठीच्या पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.विधानभवन येथे काटोल, नरखेड व मोवाड नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. बैठकीत आमदार चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, प्रधान सचिव गोविंदराज, अभिषेक कृष्णा, इ. रविंद्रन तसेच सचिव अश्विनी भिडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या तीनही शहरांतील पाणीटंचाईची समस्या दूर करणे हे करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांना दररोज नियमित पाणी मिळावे, यासाठी पायाभूत सुविधा योजनांना गती देण्यात यावी. या कामांमध्ये अडथळे निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. नगरोत्थान योजनेअंतर्गत उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 


 Give Feedback



 जाहिराती