सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 शहर

अनंतराव पवार महाविद्यालयात पेन व ग्रीटिंग कार्ड देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत

डिजिटल पुणे    12-07-2025 10:33:13

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे पेन व ग्रीटिंग कार्ड देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी महाविद्यालयात आकर्षक सजावट करण्यात आली होती. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट देखील ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात पालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकांत देशमुख यांनी केले. त्यांनी विद्यार्थी विकास मंडळ आणि सांस्कृतिक विभागाविषयी देखील विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. यावेळी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात विद्यार्थ्यांना प्रा. भरत कानगुडे यांनी माहिती दिली.

महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. अविनाश हुंबरे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाविषयी माहिती देऊन अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. तर शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनिल मरे यांनी विविध खेळाविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या संदर्भात कार्यक्रमाधिकारी डॉ. अभय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.बी.जी लोबो यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सदैव कटिबद्ध आहे. आई-वडिलांनंतर शिक्षकच असा असतो की, ज्यांना विद्यार्थ्यांकडून कुठलीही अपेक्षा नसते. फक्त त्यांनी मोठं व्हावं आणि आपल्यासहित देशाचे नाव मोठे करावे हीच त्यांची एक अपेक्षा असते. त्यासाठी पाहिजे ती मदत महाविद्यालयीन स्तरावर करण्यास महाविद्यालय तयार आहे असे आश्वासन त्यांनी बोलताना दिले.

या प्रसंगी शैलेश भिंगारदिवे, अबोली, प्रतीक्षा सुतार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रथम वर्षातील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय बालघरे आणि डॉ. नम्रता अल्हाट यांनी केले.तर आभार डॉ. ज्ञानेश महाजन यांनी मानले.


 Give Feedback



 जाहिराती