पुणे : लोकजनशक्ति पार्टी रामविलासतर्फे पुण्यातील आयकर विभागाच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट कारभाराचे पुरावे समोर आणले असून त्यांच्या आशीर्वादाने होणारी करचुकवेगिरी उघड केली आहे.११ जुलै रोजी पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी आयकर कार्यालयासमोर करचुकवेगिरीचे पुरावे प्रदर्शित केले.गोल्डन पाम इन्फ्रास्ट्रक्चर या फर्मने केलेली कर चुकवेगिरी पहिल्या टप्प्यात ११ जुलै रोजी पक्षाने उघड केली. त्याचे पुरावे आयकर कार्यालयासमोर फलकावर लावण्यात आले.पक्षाचे पुणे शहर -जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट,कायदेशीर सल्लागार आणि माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड,संपर्कप्रमुख राहुल उभे आदी यावेळी उपस्थित होते. सोमवारपासून दररोज करचुकवेगिरीचे एक प्रकरणाचा भांडाफोड केला जाणार आहे.
याआधी लोकजनशक्ति पार्टी रामविलासतर्फे पुण्यातील आयकर विभागाच्या साधू वासवानी चौकातील कार्यालयासमोर दि.९ जुलै २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन केले. .या आंदोलनात टाळ्या,थाळ्या आणि देशी वाद्य वाजवले.इन्कम टॅक्स इनफॉर्मेंट्स रिवॉर्ड स्कीम २०१८ अंतर्गत इन्फॉर्मंट कोड मिळविण्याच्या मागणीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध केला .पक्षाचे पुणे शहर -जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांनी सांगितले की,'आम्ही आयकर चुकवणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांची विश्वसनीय माहिती दिली असूनही प्रशासन त्वरित कारवाई करत नाही,त्यामुळे आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.हे सरकारच्या विरोधात आंदोलन नसून कामचुकार अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे.हे देशाच्या भल्यासाठी आंदोलन आहे. '
प्रधान मुख्य आयकर आयुक्त विभागाच्या कार्यालयातील मोहित जैन,पीयूषकुमार सिंह यादव,संदीप प्रधान,राजीव उपाध्याय या अधिकाऱ्यांना कर चुकविणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांची माहिती पक्षाने दिलेली असतानाही कारवाई केली नाही,त्याला त्यांचा निष्क्रिय आणि भ्रष्ट कारभार कारणीभूत आहे,त्यांच्यावर केंद्र सरकारने कारवाई करावी,अशी पक्षाची मागणी आहे.