सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 DIGITAL PUNE NEWS

शिरसाट-राऊत वाद चिघळला ; संजय शिरसाट संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार?

डिजिटल पुणे    12-07-2025 16:30:11

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा घरातील रुममधील पैशांच्या बॅगेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोप- प्रत्यारोपांवर संजय राऊत आणि संजय शिरसाट यांच्यातील वाद चांगलाच चिघळला होता. संजय राऊतांच्या आरोपांनंतर संजय शिरसाट चांगलेच संतापले असून आता संजय राऊत आणि संजय शिरसाट यांच्यातील वाद वाद थेट कोर्टात जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

“माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवण्यात आला आहे,” असा गंभीर आरोप शिरसाट यांनी केला आहे. तसेच, आजच मी संजय राऊत यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार आहे. जर त्यांनी या नोटीसला उत्तर दिलं नाही, तर मी थेट फौजदारी तक्रार दाखल करेन.” तसेच, “बदनामीसाठी इतक्या नीच पातळीवर कोणी जाईल, हे मी प्रथमच पाहतो आहे.”असेही त्यांनी म्हटले आहे.

संजय शिरसाट संजय राऊतांविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहेत. यासाठी ते वकिलांचा सल्लाही घेत असल्याची माहिती आहे. संजय राऊत यांनी शिरसाट यांचा घराच्या रूममधील एक व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यावरून कालपासून एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. राऊत यांनी शेअर केलेला व्हिडीओ आपला असल्याचे शिरसाट यांनी मान्य केले असले तरी त्या बॅगमध्ये पैसे नसून कपडे असल्याचा दावा शिरसाट यांनी केला. इतकेच नव्हे तर संजय शिरसाट आरोप फेटाळत असतील तर त्यांचे आणखी व्हिडीओ बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, एकीकडे आधी आयकर विभागाची नोटीस आणि आता पैशांच्या बॅगेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संजय शिरसाट चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शिरसाट यांच्याघरातील बेडरुममधील व्हिडीओमध्ये दोन बॅगा दिसत आहेत. त्यापैकी एका बॅगेत नोटांचे बंडल दिसत आहेत. ही बॅग पैशांची असून त्यात नोटांचे बंडल अशल्याचा दावा संजय राऊतांनी केला. विशेष म्हणजे संजय राऊतांनी तो व्हिडीओ ट्विटर हँडलवरून ट्विट केला आहे.


 Give Feedback



 जाहिराती