सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 विश्लेषण

डॉ. ईशा अग्रवाल यांना लंडनच्या संसद भवनात मानाचा जागतिक पुरस्कार

डिजिटल पुणे    12-07-2025 16:34:54

लंडन, संसद भवन – भारताच्या holistic health आणि wellness क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱ्या डॉ. ईशा अग्रवाल यांना, Guru Purnima च्या पवित्र दिवशी, Houses of Parliament, London येथे सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार Padmashri Lord Bob Blackman, Member of Parliament (Harrow East) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी Prince of Ghana, H.R.H. Prince Ebrahim यांचीही उपस्थिती लाभली.

भारताची संस्कृती, अध्यात्म, आणि समर्पित सेवाभाव यांचे प्रतिनिधित्व करत, डॉ. ईशा अग्रवाल यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा झेंडा उंचावला. "Holistic Health & Wellness Empowerment" क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य यामध्ये समतोल राखण्याचा त्यांनी दिलेला संदेश आणि कार्यशैली अनेक तरुण-तरुणींना सकारात्मक जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत आहे.

या भव्य समारंभात विविध देशांतील मान्यवर, खासदार, शाही प्रतिनिधी आणि जागतिक पातळीवरील विचारवंत उपस्थित होते. संसद भवनात आयोजित झालेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमात, भारताच्या प्रतिनिधी म्हणून पुरस्कार स्वीकारणे, हे डॉ. अग्रवाल यांच्यासाठी गौरवाचे आणि अभिमानाचे क्षण होते.

डॉ. ईशा अग्रवाल या याआधीही विविध आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा, अध्यात्मिक चळवळी आणि महिला सक्षमीकरण उपक्रमांमध्ये आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. याशिवाय, त्या सामाजिक जागृती, नैसर्गिक जीवनशैली, आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्येही सक्रिय आहेत.

या पुरस्कारानंतर त्या म्हणाल्या, "ही केवळ वैयक्तिक सन्मानाची बाब नाही, तर माझ्या देशासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या कार्यासाठी मिळालेली आंतरराष्ट्रीय पावती आहे. भारताचे नाव संसद भवनात घेऊन जाणे हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचे आणि नम्रतेचे कारण आहे."त्यांचा हा सन्मान म्हणजे नव्या पिढीसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे — की चिकाटी, मूल्याधिष्ठित कार्य आणि सकारात्मक दृष्टीकोन असेल, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारतातील तरुणांना यशाची शिखरे गाठता येतात.

 


 Give Feedback



 जाहिराती