सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीला धावणारे आणि वन्यजीव असलेल्या सापांचीही माणसांच्या तावडीतून सुटका करणारे सर्पमित्र आता 'फ्रंटलाइन वर्कर' होणार.
  • मुंबई लोकल स्फोट प्रकरणी आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
  • अजित पवार म्हणाले, एकदाच सांगतो दम द्यायचा बंद करा, तुमच्याकडे व्हिडिओ असेल पेन ड्राईव्ह असेल, तर बाहेर काढा आणि ते लोकांसमोर येऊ द्या, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना आव्हान दिले.
  • गणेशोत्सवासाठी न्यायालयाचा नवा आदेश; ६ फूटांपर्यंतच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन बंधनकारक
  • रशियात प्रवासी विमानाचा भीषण अपघात; ४३ जणांचा दुर्दैवी मृत्यू,मृतांमध्ये पाच लहान मुलांचा आणि कॅबिन क्रूचा समावेश
  • गांधीगिरी संपली, आता भगतसिंगगिरी सुरू, शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार, प्रहारचं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन
  • मोठी बातमी : मंगेश चिवटे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत
  • नितीन गडकरींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार घोषित; 1 ऑगस्ट रोजी दिला जाणार पुरस्कार
  • मराठी न येणाऱ्यांना मारहाण करुन द्वेष पसरवलात तर महाराष्ट्रात गुंतवणूक कोण करेल? राज्यपालांच्या वक्तव्याने नवा वाद पेटला
  • पुण्याच्या दौंडमध्ये तमाशा थिएटरमध्ये गोळीबार? डान्स करणारी तरुणी जखमी झाल्याची माहिती
  • नगरविकास खात्याच्या मोठ्या रक्कमेच्या निधीवाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी बंधनकारक असेल.
  • परभणी जिल्ह्यात एसटी अन् दुचाकीचा भीषण अपघात, 2 जण ठार
  • देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार राजकारणी असून भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केला.
  • स्वतःच्या क्लास वन अधिकारी असलेल्या पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून घर-गाडीच्या हफ्त्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
  • मला जंगली रमी येत नाही, त्यासाठी मोबाईल नंबर, बँक अकाऊंट जोडावं लागतं, दोषी असेल तर राजीनामा देतो : माणिकराव कोकाटे
  • मोठी बातमी! मुंबईत 2006 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
  • सिनेमाच्या शूटिंगवेळी ‘किंग’च्या सेटवर शाहरुख खान जखमी, उपचारासाठी अमेरिकेला रवाना; चित्रपटाचे शूटिंग दोन महिने रखडणार
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू;
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
 जिल्हा

माजी विधानपरिषद सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा

डिजिटल पुणे    23-07-2025 14:25:17

सांगली :  माजी विधानपरिषद सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे स्मारक बांधण्याकरिता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये आढावा घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सांगली महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. डी. मुधाळे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिराळाचे उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले आदि उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिराळा तालुक्यातील मौजे कोकरुड व मौजे चिंचोली येथील जलसंपदा विभागाची एकूण ४.६७ हेक्टर आर इतकी जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली.

तसेच स्मारकाच्या कामामध्ये प्रशासकीय कार्यालय, फोटो गॅलरी, मंडप, पुतळ्यासाठीचा चबुतरा, वागबगिचा, उपहारगृह, कॉन्फरन्स हॉल, बैठक व्यवस्था, खुले सभागृह ओपन जीम, अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी विश्रामगृह, वेध शाळा, पार्किंग एरिया, स्वच्छतागृह व चौकीदार कक्ष इत्यादी बाबींची तरतूद करुन प्रस्तावासंदर्भात लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्याच्या  या बैठकीमध्ये देण्यात आल्या.


 Give Feedback



 जाहिराती