सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिव्याच्या विजयाने मला तिहेरी अभिमान आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखच्या बुद्धीबळातील सुवर्ण विजयाचे कौतुक केले.
  • एकमेकांवर आरोप करून महाराष्ट्र आपल्याला अशांत करायचाय का? यवतमधील तणावावरून राज्यमंत्री रामदास आठवलेंनी विरोधकांना सुनावलं
  • पुण्यातील एमआयडीसीमध्ये अजितदादांची दादागिरी आहे का? फडणवीसांनी नावं जाहीर करावी; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर रोहित पवारांचा हल्लाबोल
  • ‘श्यामची आई’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
  • अजित पवार यवत मधे दाखल .तणावाची परिस्थिती नियंत्रणात
 क्राईम

तांदूळवाडी येथील सरकारी तरुण कंत्राटदाराने गळफास घेऊन जीवन संपविले; राज्य सरकार जबाबदार?

डिजिटल पुणे    24-07-2025 14:17:43

सांगली : तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील तरुण अभियंता हर्षल पाटील (39) यांनी लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या सुमारे 1.40 कोटींच्या कामांची बिले न मिळाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप ठेकेदार संघटनांनी केला आहे. त्यांनी 65 लाखांचे कर्ज घेतले होते. शासनाने तातडीने आर्थिक मदत व प्रलंबित बिले द्यावीत, अशी मागणी करण्यात आली असून अन्यथा अनेक कंत्राटदार अशाच परिस्थितीत अडकतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून केलेल्या कामाचा मोबदला वेळेत न मिळाल्याने एका सरकारी कंत्राटदाराला टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे. यामुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे.लाडकी बहिण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खळखळाट पाहायला मिळत आहे. अशातच सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. कंत्राटदाराच्या कामाचे शासनाकडे जवळपास १.४० कोटींचे देयके १ वर्षापासून निधीच उपलब्ध नसल्याचे कारण देत थकवण्यात आली होते. या नैराश्यातू तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

हर्षल पाटील असे या तरुणाचे नाव आहे. त्याने स्वतःच्या शेतात जाऊन गळफास घेईन आत्महत्या केली. या घटनेनंतर आता सरकारवप सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेकडून आरोपांसह टीका केली जात आहे. तसेच प्राथमिक माहितीनुसार, राज्य सरकारकडून केलेल्या कामाचा मोबदला वेळत न मिळाल्याने पाटील याने आत्महत्या केल्याचे समजते.

 हर्षल हेच घरातील मोठा अन् कर्ता होता. आता त्याच्या पश्चात पत्नी, एक पाच वर्षांची मुलगी, दोन लहान भाऊ व‌ आई वडील असा परिवार‌ आहे. दरम्यान यावरून आता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणीपुरवठा संघटना राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले यांनी सरकारला इशारा दिला आहे.त्यांनी हर्षलने केलेल्या कामाचे देय सरकारने लवकर त्यांच्या पत्नीच्या नावे वर्ग करावे. तसे न केल्यास शासनास फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला आहे.


 Give Feedback



 जाहिराती