सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 15-20 गाड्या एकमेकांवर धडकल्या, अनेकजण जखमी
  • लाडकी बहीण योजनेत गैरव्यवहार; तब्बल १४,२९८ पुरुषांनी लाटला योजनेचा लाभ
  • मंत्रीपदावर गदा येण्याची शक्यता; इडा पिडा टळण्यासाठी माणिकराव कोकाटे थेट शनिदेवाच्या चरणी; मंदिरात दर्शन घेऊन पूजाअर्चा केली
  • आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न, विमान थेट हायवेवर कोसळलं; विमानाच्या धडकेमुळे दोन कारना आग लागली ज्यामध्ये एका चालकाला गंभीर दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तर दुसऱ्यावर घटनास्थळीच उपचार करण्यात आले.
  • मोठी बातमी : माणिकराव कोकाटेंचा मंगळवारपर्यंत राजीनामा होण्याची शक्यता,
  • नितीन गडकरींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार घोषित; 1 ऑगस्ट रोजी दिला जाणार पुरस्कार
  • मराठी न येणाऱ्यांना मारहाण करुन द्वेष पसरवलात तर महाराष्ट्रात गुंतवणूक कोण करेल? राज्यपालांच्या वक्तव्याने नवा वाद पेटला
 जिल्हा

हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन – पालकमंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही

डिजिटल पुणे    26-07-2025 15:09:40

बुलढाणा :  जिल्ह्यातील सोयाबीन व मका पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले असले तरी, या संकटावर मात करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिली आहे.प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ३१३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. बाधित क्षेत्रातील पंचनामे जलदगतीने सुरू असून, शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळवून दिली जाईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, शास्त्रज्ञ व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी २४ जुलै रोजी प्रसारित केलेल्या तांत्रिक बुलेटिननुसार, अळीच्या जीवनचक्रावर आधारित एकात्मिक व्यवस्थापनाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांनी केले आहे.

हुमणी अळी नियंत्रणासाठी उपाययोजना: हुमणी अळी ओळखणे: हुमणी अळी इंग्रजी ‘C’ अक्षराच्या आकाराची असून, पूर्ण वाढ झाल्यावर ती तीन ते पाच सेंटीमीटर रुंद आणि पांढुरक्या रंगाची असते. ही अळी सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी, मूग, ऊस, सूर्यफूल, मिरची आणि वांगी यांसारख्या पिकांच्या मुळांवर उपजीविका करते. यामुळे पिके कमकुवत होऊन जमिनीवर कोलमडतात. पिकांमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी, बाधित झाडांची पाने पिवळी पडून सुकतात.

 

सौम्य प्रादुर्भावासाठी जैविक नियंत्रण:  जर शेतात हुमणी अळीचा सौम्य किंवा तुरळक प्रादुर्भाव आढळल्यास, ‘मेटारायझियम’ (Metarizhium) या जैविक कीटकनाशकाचा वापर करावा. ४० मिली ‘मेटारायझियम’ १० लिटर पाण्यात मिसळून पिकांच्या मुळाजवळ टाकावे. तसेच, १ किलो ‘मेटारायझियम’ भुकटी १०० किलो शेणखतात मिसळून प्रति हेक्टर शेतात फेकावी. हे जैविक कीटकनाशक वापरताना शेतात पुरेशी ओल असल्याची खात्री करावी.

तीव्र प्रादुर्भावासाठी रासायनिक नियंत्रण:  हुमणी अळीचा तीव्र किंवा लक्षणीय प्रादुर्भाव आढळून आल्यास, स्थानिक तज्ञांच्या सल्ल्याने रासायनिक कीटकनाशकांचा सुरक्षित वापर करावा. Fipronil 40% + Imidacloprid 40% या मिश्र दाणेदार कीटकनाशकाचे ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात द्रावण तयार करून झाडाच्या खोडाजवळ टाकावे.  Thiamethoxam 0.9% + Fipronil 2% या मिश्र दाणेदार कीटकनाशकाचा १२ ते १५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीत ओलावा असताना झाडाच्या खोडाजवळ वापर करावा.

शेतकऱ्यांनो, रसायनांचा वापर करताना लेबलवरील मार्गदर्शक सूचना व प्रमाणाचे काटेकोर पालन करावे. कोणतेही मिश्रण टाळून, तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपचार करावेत. “शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत,” अशी ग्वाही ना.मकरंद पाटील यांनी  यावेळी दिली.


 Give Feedback



 जाहिराती