सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा, महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यात गेलेच कसे? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
  • मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
  • मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
  • कितीदा चुकणार, कितीदा माफ करणार? अजित पवारांचा माणिकराव कोकाटेंच्या कट्टर समर्थकांना रोखठोक सवाल
  • कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, बोलताना भान ठेवायला हवं; अजित पवारांनी अँटी चेंबरमध्ये माणिकरावांना सुनावलं
  • छातीत दुखतंय म्हणत मिटींगमधून बाहेर पडला, सातव्या मजल्यावरून उडी घेत 23 वर्षीय IT इंजिनिअरचं टोकाचं पाऊल, पुण्यात खळबळ
  • मुंबई नाशिक, वसई-विरारसह महाराष्ट्रात 12 ठिकाणी ईडीची छापेमारी; डम्पिंग ग्राऊंडवर उभारलेला 41 अनधिकृत इमारतीच्या प्रकरणी छापा
  • बई नाशिक, वसई-विरारसह महाराष्ट्रात 12 ठिकाणी ईडीची छापेमारी; डम्पिंग ग्राऊंडवर उभारलेला 41 अनधिकृत इमारतीच्या प्रकरणी छापा
  • पहलगाम हल्ल्याचा बदला, ऑपरेशन महादेवला यश, पर्यटकांना मारणारे 2 दहशतवादी ठार!
  • श्रीनगरमध्ये भारतीय सैन्याकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; श्रावणी सोमवारी राबवलेल्या 'ऑपरेशन महादेव'ला मोठं यश!
  • श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी शंकराच्या मंदिरात चेंगराचेंगरी उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील औसनेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी चेंगराचेंगरी झाली. या अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर महिला आणि मुलांसह २९ जण जखमी झाले.
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 15-20 गाड्या एकमेकांवर धडकल्या, अनेकजण जखमी
  • लाडकी बहीण योजनेत गैरव्यवहार; तब्बल १४,२९८ पुरुषांनी लाटला योजनेचा लाभ
  • मंत्रीपदावर गदा येण्याची शक्यता; इडा पिडा टळण्यासाठी माणिकराव कोकाटे थेट शनिदेवाच्या चरणी; मंदिरात दर्शन घेऊन पूजाअर्चा केली
 शहर

विजय दिनाचा मुख्य उद्देश भारताचा गौरवशाली इतिहास मुलांना कळावा हाच आहे – मंगलप्रभात लोढा

डिजिटल पुणे    26-07-2025 17:44:34

पुणे :- भारताचा इतिहास हा गौरवशाली इतिहास आहे. जो पर्यंत मुलांना भारताचा गौरवशाली इतिहास समजणार नाही तो पर्यंत त्यांच्या मनात जोश निर्माण होणार नाही. आय टी आय मध्ये प्रथमच विजय दिवस साजरा केला जात असून,भारताचा गौरवशाली इतिहास मुलांना समजावा हाच विजय दिनाचा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.लोणावळा येथील क्रांतीकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोणावळा क्रांतिकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रतिभा चव्हाण, पुणे प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक चंद्रशेखर ढेकणे आदी उपस्थित होते.

श्री.लोढा पुढे म्हणाले, इस्त्राईल लहान देश आहे पण प्रत्येक नागरिकामध्ये देशप्रेमाची भावना असल्यामुळे देश लहान असला तरी तो लढतो व जिंकतो आहे. देशासाठी लढणाऱ्यांच्या इतिहास बाबतची माहिती जागोजागी प्रदर्शित केली पाहिजे. लोणावळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये १४ विविध प्रकारचे कोर्सेस सुरु असून,अजून  छोटे कोर्सेस सुरू करण्याचा विचार आहे. विद्यार्थ्यांना बोलते करा  त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही तसेच कुशल प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. लोणावळा येथे पर्यटनासाठी मोठ्या संख्येने लोक येत असतात, त्यामुळे मुलांनी हॉस्पिटॅलिटी व्यवसायात पुढे येणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी  म्हणाले.

माजी सैनिक महेश थत्ते म्हणाले, कारगिलच्या लढाईने देशाने नेहमी  युद्धासाठी सज्ज राहावे असा संदेश दिला. या युद्धामुळे भारताची प्रगल्भता वाढली आहे आणि भारताला एक चांगला युद्धाचा अनुभव मिळाला आहे . यावेळी त्यांनी कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.लेखिका व साहित्यिक मंजुश्री मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटनिदेशक श्री पासलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी श्रेया चामरे यांनी केले. याप्रसंगी  लोणावळा परिसरातील माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला क्रांतीकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक,कर्मचारी, विद्यार्थी व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती