सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा, महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यात गेलेच कसे? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
  • मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
  • मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
  • कितीदा चुकणार, कितीदा माफ करणार? अजित पवारांचा माणिकराव कोकाटेंच्या कट्टर समर्थकांना रोखठोक सवाल
  • कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, बोलताना भान ठेवायला हवं; अजित पवारांनी अँटी चेंबरमध्ये माणिकरावांना सुनावलं
  • छातीत दुखतंय म्हणत मिटींगमधून बाहेर पडला, सातव्या मजल्यावरून उडी घेत 23 वर्षीय IT इंजिनिअरचं टोकाचं पाऊल, पुण्यात खळबळ
  • मुंबई नाशिक, वसई-विरारसह महाराष्ट्रात 12 ठिकाणी ईडीची छापेमारी; डम्पिंग ग्राऊंडवर उभारलेला 41 अनधिकृत इमारतीच्या प्रकरणी छापा
  • बई नाशिक, वसई-विरारसह महाराष्ट्रात 12 ठिकाणी ईडीची छापेमारी; डम्पिंग ग्राऊंडवर उभारलेला 41 अनधिकृत इमारतीच्या प्रकरणी छापा
  • पहलगाम हल्ल्याचा बदला, ऑपरेशन महादेवला यश, पर्यटकांना मारणारे 2 दहशतवादी ठार!
  • श्रीनगरमध्ये भारतीय सैन्याकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; श्रावणी सोमवारी राबवलेल्या 'ऑपरेशन महादेव'ला मोठं यश!
  • श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी शंकराच्या मंदिरात चेंगराचेंगरी उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील औसनेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी चेंगराचेंगरी झाली. या अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर महिला आणि मुलांसह २९ जण जखमी झाले.
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 15-20 गाड्या एकमेकांवर धडकल्या, अनेकजण जखमी
  • लाडकी बहीण योजनेत गैरव्यवहार; तब्बल १४,२९८ पुरुषांनी लाटला योजनेचा लाभ
  • मंत्रीपदावर गदा येण्याची शक्यता; इडा पिडा टळण्यासाठी माणिकराव कोकाटे थेट शनिदेवाच्या चरणी; मंदिरात दर्शन घेऊन पूजाअर्चा केली
 शहर

पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना! श्री साई मित्र मंडळात यंदा लेकी कारभारी - केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निर्णय

डिजिटल पुणे    26-07-2025 18:45:05

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचे यंदाचे ३०० वे वर्ष आहे. विविध कार्यक्रमातून, उपक्रमातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. एकीकडे गणेशोत्सवाला यंदा महाराष्ट्र सरकारने राज्यउत्सव म्हणून मान्यता द्यायचा निर्णय घेतला असताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या साई मित्र मंडळाने  यंदाच्यावर्षी मंडळाचा सर्व कारभाराची दोरी महिलांच्या हातात देण्याचा औचित्यपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून यंदा महिलांच्या हाती कारभार देत मंडळ वेरुळ येथील कैलास मंदीर साकारणार आहे. या देखाव्याच्या कामाचे कळसपूजन चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी केंद्रीय मोहोळ यांनी ही घोषणा केली.

कोथरूड परिसरातील केंद्रीय मंत्री मोहोळ  संस्थापक असलेले श्री साई मित्र मंडळ हे भव्य व देखण्या प्रतिकृती गणेशोत्सवात सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यंदाच्यावर्षी ३० वा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, अशीच भव्य, आकर्षक आणि कलात्मक प्रतिकृती सादर करताना मंडळाची धुरा महिलांच्या हातात त्यांनी दिली आहे. यंदाच्या उत्सवाचे सर्व संयोजन महिलाभगिनी करणार आहेत. त्यांना सहाय्यक म्हणून पुरूष कार्यकर्ते काम करणार आहेत.

भारतीय शिल्पकारांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका पाषाणात कैलास लेणीची केलेली निर्मिती हे जगभरासाठी आश्चर्य ठरले आहे. ही लेणी बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने परदेशी पर्यटक दरवर्षी वेरूळला भेट देतात. या कैलास लेणी संकुलातील ‘कैलास मंदिराची’ प्रतिकृती मंडळाच्यावतीने यंदा करण्यात येणार आहे. या सजावटीच्या कामाच्या कळस पूजनाचा शुभारंभ यावेळी प्रसिद्ध मूर्ती आणि मंदिर अभ्यासक गणेश धालपे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गेल्यावर्षी आयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती मंडळाने केली होती.

याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘गणेश मंडळांचा मुख्य कारभार पुरूष मंडळींच्याच हातात असतो. मंडळातील महिला भगिनी काम करतातच, मात्र त्यांना खुले व्यासपीठ मिळत नाही. मात्र हे चित्र बदलायचे असून यंदाचे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे ३०० वे वर्षे आपण साजरे करत आहोत. त्यानिमित्ताने आमच्या मंडळातील महिला भगिनी अनोखी आदरांजली वाहतील. अहिल्यादेवींच्या चरित्रापासून महिला वर्गाल स्फूर्ती मिळावी आणि त्यांचा सार्वजनिक कामातील माताभिगीनींचा आत्मविश्वास, सहभाग वाढवण्यासाठी आम्ही सर्वांनी ही निर्णय घेतला आहे’


 Give Feedback



 जाहिराती