सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा, महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यात गेलेच कसे? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
  • मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
  • मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
  • कितीदा चुकणार, कितीदा माफ करणार? अजित पवारांचा माणिकराव कोकाटेंच्या कट्टर समर्थकांना रोखठोक सवाल
  • कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, बोलताना भान ठेवायला हवं; अजित पवारांनी अँटी चेंबरमध्ये माणिकरावांना सुनावलं
  • छातीत दुखतंय म्हणत मिटींगमधून बाहेर पडला, सातव्या मजल्यावरून उडी घेत 23 वर्षीय IT इंजिनिअरचं टोकाचं पाऊल, पुण्यात खळबळ
  • मुंबई नाशिक, वसई-विरारसह महाराष्ट्रात 12 ठिकाणी ईडीची छापेमारी; डम्पिंग ग्राऊंडवर उभारलेला 41 अनधिकृत इमारतीच्या प्रकरणी छापा
  • बई नाशिक, वसई-विरारसह महाराष्ट्रात 12 ठिकाणी ईडीची छापेमारी; डम्पिंग ग्राऊंडवर उभारलेला 41 अनधिकृत इमारतीच्या प्रकरणी छापा
  • पहलगाम हल्ल्याचा बदला, ऑपरेशन महादेवला यश, पर्यटकांना मारणारे 2 दहशतवादी ठार!
  • श्रीनगरमध्ये भारतीय सैन्याकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; श्रावणी सोमवारी राबवलेल्या 'ऑपरेशन महादेव'ला मोठं यश!
  • श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी शंकराच्या मंदिरात चेंगराचेंगरी उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील औसनेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी चेंगराचेंगरी झाली. या अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर महिला आणि मुलांसह २९ जण जखमी झाले.
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 15-20 गाड्या एकमेकांवर धडकल्या, अनेकजण जखमी
  • लाडकी बहीण योजनेत गैरव्यवहार; तब्बल १४,२९८ पुरुषांनी लाटला योजनेचा लाभ
  • मंत्रीपदावर गदा येण्याची शक्यता; इडा पिडा टळण्यासाठी माणिकराव कोकाटे थेट शनिदेवाच्या चरणी; मंदिरात दर्शन घेऊन पूजाअर्चा केली
 शहर

‘जीविधा’ या संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सव ;३० जुलै पासून तीन दिवस कार्यक्रम

डिजिटल पुणे    28-07-2025 17:18:00

पुणे : स्थानिक देशी वनस्पतींच्या संवर्धनासाठी गेली १७  वर्षे कार्यरत असलेल्या ‘जीविधा’ या संस्थेच्या वतीने यंदाही हिरवाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.३०  जुलै ते  दि .१ ऑगस्ट २०२५  या कालावधीत तीन दिवस दररोज सायंकाळी साडेसहा  ते ८  या वेळेत इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर, पुणे येथे हा महोत्सव  होणार आहे.हिरवाई महोत्सवामागचा उद्देश  नागरिकांना स्थानिक देशी वनस्पतींबाबत जागरूक करणे आणि त्यांच्या लागवडीत जनसहभाग वाढवणे,हा आहे. यंदाच्या महोत्सवाची संकल्पना 'परस्पर संवाद' अशी असून त्यामध्ये वनस्पती आणि प्राणी जगत यांच्यातील परस्परसंबंधांविषयी सखोल माहिती देणाऱ्या व्याख्यानांचा समावेश आहे.

बुधवार, दि.३० जुलै रोजी ‘वनस्पती आणि कीटक यातील संबंध’ या विषयावर पर्यावरण अभ्यासक ईशान पहाडे यांचे व्याख्यान होणार आहे. गुरुवार, दि.३१ जुलै रोजी डॉ. अंकुर पटवर्धन हे ‘वनस्पती आणि पक्षी-सस्तनप्राणी यांच्यातील संबंध’ याविषयी माहिती देतील. शुक्रवार, दि.१ ऑगस्ट रोजी आयसर संस्थेतील संशोधक डाॅ.सागर पंडित यांच्याशी 'वनस्पतींचा रासायनिक संवाद' या विषयावर प्रसिद्ध वनस्पतीतज्ज्ञ डॉ.महेश शिंदीकर चर्चा करणार आहेत.

 वनस्पती स्वतःच्या अन्ननिर्मितीसाठी, घरट्यासाठी वा संरक्षणासाठी प्राण्यांवर अवलंबून असतात. दुसरीकडे, प्राणीही अन्नसाखळीचा भाग म्हणून वनस्पतींच्यावर अवलंबून असतात. बीजप्रसार, परागीभवन आणि प्रजोत्पत्ती यासाठी कीटक, पक्षी, सस्तन प्राणी यांची भूमिका महत्त्वाची असते. हाच जैव सहजीवनाचा विषय या महोत्सवाच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे.कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून पर्यावरणप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन राजीव पंडित,वृंदा पंडित यांनी  केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती