सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महत्त्वाची सूचना आहे. कारण, येथील तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे.मंदिर समितीचा निर्णय, भाविकांना केवळ मुखदर्शन
  • रशियात भूकंपाचा जोरदार धक्का ! 8.7 रिश्टर स्केल तीव्रता नागरिक भयभीत ,अमेरिकेपासून ते जपानपर्यंत त्सुनामी अलर्ट जारी
  • लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा, महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यात गेलेच कसे? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
  • मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
  • मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
  • कितीदा चुकणार, कितीदा माफ करणार? अजित पवारांचा माणिकराव कोकाटेंच्या कट्टर समर्थकांना रोखठोक सवाल
  • कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, बोलताना भान ठेवायला हवं; अजित पवारांनी अँटी चेंबरमध्ये माणिकरावांना सुनावलं
  • छातीत दुखतंय म्हणत मिटींगमधून बाहेर पडला, सातव्या मजल्यावरून उडी घेत 23 वर्षीय IT इंजिनिअरचं टोकाचं पाऊल, पुण्यात खळबळ
  • मुंबई नाशिक, वसई-विरारसह महाराष्ट्रात 12 ठिकाणी ईडीची छापेमारी; डम्पिंग ग्राऊंडवर उभारलेला 41 अनधिकृत इमारतीच्या प्रकरणी छापा
  • बई नाशिक, वसई-विरारसह महाराष्ट्रात 12 ठिकाणी ईडीची छापेमारी; डम्पिंग ग्राऊंडवर उभारलेला 41 अनधिकृत इमारतीच्या प्रकरणी छापा
  • पहलगाम हल्ल्याचा बदला, ऑपरेशन महादेवला यश, पर्यटकांना मारणारे 2 दहशतवादी ठार!
  • श्रीनगरमध्ये भारतीय सैन्याकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; श्रावणी सोमवारी राबवलेल्या 'ऑपरेशन महादेव'ला मोठं यश!
  • श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी शंकराच्या मंदिरात चेंगराचेंगरी उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील औसनेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी चेंगराचेंगरी झाली. या अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर महिला आणि मुलांसह २९ जण जखमी झाले.
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 15-20 गाड्या एकमेकांवर धडकल्या, अनेकजण जखमी
  • लाडकी बहीण योजनेत गैरव्यवहार; तब्बल १४,२९८ पुरुषांनी लाटला योजनेचा लाभ
  • मंत्रीपदावर गदा येण्याची शक्यता; इडा पिडा टळण्यासाठी माणिकराव कोकाटे थेट शनिदेवाच्या चरणी; मंदिरात दर्शन घेऊन पूजाअर्चा केली
 शहर

पुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार 'अंकनाद गणित सात्मीकरण प्रणाली ;गणिताची गोडी वाढविण्यासाठी इंडिविश वेलफेअर फाऊंडेशन चा पुढाकार

डिजिटल पुणे    29-07-2025 12:59:36

पुणे : शालेय वयात असणारी गणिताची भीती कमी करून अवघड वाटणाऱ्या या विषयाशी मैत्री करण्यात मदत करणारी “अंकनाद – गणिताची सात्मिकरण प्रणाली” ही इंडिविश वेलफेअर फाऊंडेशन मुंबई च्या माध्यमातून पुण्यातील प्रथितयश शिक्षण संस्थेतील १२७५० विद्यार्थ्यांकरिता देण्यात येणार आहे. मॅप एपिक कम्युनिकेशन्स  प्रा. लि., पुणे निर्मित 'अंकनाद –गणिताची सात्मिकरण प्रणाली'चे वितरण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या  पुण्यतिथिदिनी, दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी बारा वाजता करण्यात येणार आहे.यासंबंधीचा प्रातिनिधिक कार्यक्रम भावे हायस्कूल(सदाशिव पेठ) येथे  होणार आहे.यावेळी महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबा शिंदे,मॅप एपिक कम्युनिकेशन्स  प्रा. लि चे संचालक मंदार नामजोशी,निर्मिती नामजोशी,पराग गाडगीळ तसेच इंडिविश वेलफेअर फाऊंडेशन चे अधिकारी   उपस्थित राहणार आहेत.इंडिविश वेलफेअर फाऊंडेशन च्या वतीने पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. 

इंडिविश वेलफेअर फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था गणिताच्या मूलभूत गोष्टी रुजवण्यात प्रयत्नशील आहे. पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळी, डेक्कन एज्यूकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटी आणि महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मिळून एकूण ८७ विद्यालयातील २५५ वर्गात ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांमध्ये मिळून एक,याप्रमाणे  या प्रणालीचे एक उपकरण (एम पी ३ डिवाइस) देण्यात येणार आहे. 

अनेक सर्वेक्षणातून असे निदर्शनात आले आहे की, ९०% विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती असते. ही भीती कमी करण्यात व गणीताशी मैत्री करण्यात, “अंकनाद – गणिताची सात्मिकरण प्रणाली” उपयुक्त आहे. सदर प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगीतबद्ध पूर्णांक,अपूर्णांकांचे व वर्गांचे पाढे आत्मसात करणे सोपे  होईल आणि गणीता शी त्यांची मैत्री होईल. गणित, सर्व विषयांची जननी आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांची गणीतशी मैत्री होणे जरुरीचे आहे. म्हणूनच, इंडिविश वेलफेअर फाऊंडेशन ही स्वयंमसेवी संस्था गणिताच्यामूलभूत गोष्टी रुजवण्यात प्रयत्नशील आहे.

 “अंकनाद– गणिताची सात्मिकरण प्रणाली” तीन टप्प्यात विभागली आहे.पहिल्या टप्प्यात  श्रवणसंस्कारातून पूर्णांक, अपूर्णांकांचे व वर्गांचे आत्मसात करणे, द्वितीय टप्प्यात मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासनच्या संयुक्त विद्यमाने पाढे  सात्मिकरण   स्पर्धा आणि तिसऱ्या टप्प्यात  'गणीतालय' पोर्टल चे सभासद होणे. या पोर्टल वर विद्यार्थ्यां करिता गणीतीय संकल्पनावरचे १२०० हून  अधिक व्हीडियो, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे १००० हून  अधिक मार्गदर्शक उपलब्ध आहेत. तसेच गणित विषयाचा इतर विषयांशी संबंध अधोरेखित करणारे असंख्य वेबिनार  उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार शक्तीस यामुळे चालना मिळेल आणि त्यांचा उजवा मेंदू कार्यान्वित होण्यास मदत होईल. ह्या प्रणाली मुळे विद्यार्थ्यांचा  सर्वांगीण विकास होईल, यात शंकाच नाही,असे मंदार नामजोशी यांनी या पत्रकात म्हटले आहे. 


 News Feedback

Digital Pune
शमुवेल मुरली माळी
 29-07-2025 13:35:21

भाग घ्यायच आहे

Digital Pune
Siddhi Dnyaneshwar Gadhave
 29-07-2025 18:59:59

Hiiii

Digital Pune
Siddhi Dnyaneshwar Gadhave
 29-07-2025 19:01:42

Hii Hi thanks

Digital Pune
Siddhi Dnyaneshwar Gadhave
 29-07-2025 19:02:10

Thanks

Digital Pune
Medhansh sameer taru
 30-07-2025 13:57:02

भाग घ्यायचा आहे

 Give Feedback



 जाहिराती