सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिव्याच्या विजयाने मला तिहेरी अभिमान आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखच्या बुद्धीबळातील सुवर्ण विजयाचे कौतुक केले.
  • एकमेकांवर आरोप करून महाराष्ट्र आपल्याला अशांत करायचाय का? यवतमधील तणावावरून राज्यमंत्री रामदास आठवलेंनी विरोधकांना सुनावलं
  • पुण्यातील एमआयडीसीमध्ये अजितदादांची दादागिरी आहे का? फडणवीसांनी नावं जाहीर करावी; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर रोहित पवारांचा हल्लाबोल
  • ‘श्यामची आई’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
  • अजित पवार यवत मधे दाखल .तणावाची परिस्थिती नियंत्रणात
 क्राईम

पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत राडा; अल्पवयीन मुलांना गुन्हेगारकडून बेदम मारहाण

डिजिटल पुणे    29-07-2025 14:04:27

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्याने खून, मारामाऱ्या, कोयता गँगची दहशत अशा गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असलेल्या विद्येचे माहेरघर म्हणणाऱ्या पुण्यात भाईगिरीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. आपल्या मुलासोबत वाद घातला म्हणून एका सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. किशोर भेगडे असे या आरोपीचे नाव आहे.

किशोर भेगडे हा मावळ विधानसभेची निवडणूक लढलेल्या बापू भेगडे यांचा पुतण्या आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून किशोर भेगडे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

नेमकी घटना काय?

सोमवारी  सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये किशोर भेगडेचा मुलगा आणि त्याचे मित्र खेळत होते. खेळता-खेळता अगदी क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. ही गोष्ट किशोर भेगडेला समजली. त्यानंतर त्याने मुलांच्या मित्रांना जाब विचारत मारहाण केली. भांडणावेळी या मुलांनी एकमेकांना शिवीगाळ गेली. त्यामुळे हा वाद वाढला. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये भेगडे याने अल्पवीयन मुलाच्या पोटात फाईट मारल्याचे दिसते.  हा प्रकार सुरु असताना आजुबाजूचे लोक किशोर भेगडे याला थांबवण्याचा आणि मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. याप्रकरणी १५ वर्षीय मुलाच्या नातेवाईकांनी किशोर भेगडे याच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.भेगडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण असे अनेक गुन्हे दाखल आहेत.


 Give Feedback



 जाहिराती