सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिव्याच्या विजयाने मला तिहेरी अभिमान आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखच्या बुद्धीबळातील सुवर्ण विजयाचे कौतुक केले.
  • एकमेकांवर आरोप करून महाराष्ट्र आपल्याला अशांत करायचाय का? यवतमधील तणावावरून राज्यमंत्री रामदास आठवलेंनी विरोधकांना सुनावलं
  • पुण्यातील एमआयडीसीमध्ये अजितदादांची दादागिरी आहे का? फडणवीसांनी नावं जाहीर करावी; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर रोहित पवारांचा हल्लाबोल
  • ‘श्यामची आई’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
  • अजित पवार यवत मधे दाखल .तणावाची परिस्थिती नियंत्रणात
 क्राईम

हिंजवडीत 23 वर्षीय आयटी अभियंत्याची कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिल..

डिजिटल पुणे    29-07-2025 14:48:49

पुणे : आयटी हब हिंजवडीमधून एक धक्कादायक घटना समोर आली.23 वर्षीय आयटी अभियंत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. हिंजवडी फेज एक येथील अॅटलास कॉपको कंपनीच्या सातव्या मजल्यावरून तरुणाने उडी मारली. पीयूष कवडे असे मयत आयटी इंजिनिअरचे नाव आहे. ही घटना सोमवार दुपारी घडली. 'माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये' अशा आशयाची चिठ्ठी या अभियंत्याने लिहून ठेवली आहे. पीयूष अशोक कवडे, वय 23 वर्ष, रा. वाकड, मूळ रा. नाशिक, असे आत्महत्या केलेल्या अभियंता तरुणाचे नाव आहे. छातीत दुखत असल्याचे सांगत मिटिंग सोडून बाहेर येत आयटी अभियंत्याने बिल्डिंग वरून उडी मारत मृत्यूला कवटाळले आहे. या घटनेने हिंजवडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाचे नाव पियुष अशोक कवडे वय 23 वर्षे, असून  रा स्वप्नशिल्प बंगला, ज्यूडिओ समोर वाकड पुणे मूळ रा परशुराम गंगाराम रोड, आकाशवाणी जवळ, नाशिक. सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समजते. ॲटलास कॉपको कंपनीमध्ये तो काम करतो. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली  त्यामध्ये लिहिण्यात आले आहे ,की  "मी आयुष्यात सगळ्या ठिकाणी अपयशी ठरलो आहे, मला माफ करा," असं सुसाईड नोटमध्ये लिहिलेल आहे. पीयूष हा मूळ नाशिकचा असून सध्या तो वाकड येथे राहत होता. त्याच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत


 Give Feedback



 जाहिराती