सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दहशतवादाचा कोणताही रंग, धर्म नाही; मालेगाव बाॅम्बस्फोट निकाल देताना विशेष एनआयए न्यायाधीशांची टिप्पणी
  • 'माझ्याच देशाने आतंकवादी बनवलं',न्यायालयाच्या निर्णयानंतर साध्वी प्रज्ञांना अश्रु अनावर झाले. माझ्याच देशाने मला आतंकवादी बनवलं अशी खंत व्यक्त केली.
  • मोठी बातमी: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका; 17 वर्षांनंतर निकाल जाहीर
  • एकीकडे भारतावर 25 टक्के टेरिफ लावणाऱ्या अमेरिकेने पाकिस्तानला मात्र झुकतं माप देत मोठा करार केल्याचं समोर आलं आहे.
  • महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महत्त्वाची सूचना आहे. कारण, येथील तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे.मंदिर समितीचा निर्णय, भाविकांना केवळ मुखदर्शन
  • रशियात भूकंपाचा जोरदार धक्का ! 8.7 रिश्टर स्केल तीव्रता नागरिक भयभीत ,अमेरिकेपासून ते जपानपर्यंत त्सुनामी अलर्ट जारी
  • मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
 जिल्हा

कमी दर्जाच्या तांदळाच्या प्रयोगशाळा तपासणीचे निर्देश

डिजिटल पुणे    30-07-2025 16:36:45

मुंबई : केंद्रीय तपासणी पथकाच्या तपासणीत ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा कमी दर्जाचा तांदूळ (BRL) आढळून आला होता. या तांदळाची प्रयोगशाळा तपासणी करून वापराबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.अन्न व नागरी पुरवठा विभागाची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली. यावेळी श्री. भुजबळ बोलत होते. बैठकीस प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, शिधा वाटप नियंत्रक सुधाकर तेलंग उपस्थित होते.

अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, संबंधित गिरणीधारकांनी (राईस मिलधारकांनी) कमी दर्जाचा तांदूळ बदलून देणे अपेक्षित होते. मात्र, ही जबाबदारी न पाळल्यामुळे अशा गिरणीधारकांना राज्य शासनाने काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही प्रस्तावित केली होती. या कार्यवाहीविरोधात संबंधित राईस मिलधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या असून, विभागाने न्यायालयास आवश्यक माहिती सादर करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

केंद्रीय पथकाच्या नियमित तपासणी अंतर्गत पुणे व नागपूर विभागातील ९ जिल्ह्यांतील राज्य शासनाची गोदामे, धान्य भरडाई गिरण्या आणि स्वस्त धान्य दुकाने तपासण्यात आली. या तपासणीत एकूण २३१ नमुने (२२६ तांदळाचे व ५ गव्हाचे) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अशी माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाच्या अधिकारी – कर्मचारी संघटनांच्या मागण्याबाबतही माहिती घेतली. यात अधिकारी – कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, पदोन्नती तसेच व्यपगत पदे या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या.


 Give Feedback



 जाहिराती