सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजित पवार यवत मधे दाखल .तणावाची परिस्थिती नियंत्रणात
  • जीममध्ये सकाळी नेहमीप्रमाणे व्यायाम करताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू;पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
  • दुपारी बाजारपेठेत 20 वर्षीय व्यापारी तरुणावर गोळीबार; गळ्यातला सोन्याचा ऐवजही पळवला, घटनेने पिंपरी चिंचवड शहर हादरलं
  • दहशतवादाचा कोणताही रंग, धर्म नाही; मालेगाव बाॅम्बस्फोट निकाल देताना विशेष एनआयए न्यायाधीशांची टिप्पणी
  • 'माझ्याच देशाने आतंकवादी बनवलं',न्यायालयाच्या निर्णयानंतर साध्वी प्रज्ञांना अश्रु अनावर झाले. माझ्याच देशाने मला आतंकवादी बनवलं अशी खंत व्यक्त केली.
  • मोठी बातमी: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका; 17 वर्षांनंतर निकाल जाहीर
 जिल्हा

विले पार्ले येथील बेकायदेशीर संकुल बांधकामाची संयुक्त स्थळ पाहणी करावी – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

डिजिटल पुणे    31-07-2025 17:08:39

मुंबई : मनुभारती सोसायटी के-पश्चिम वॉर्ड, विले पार्ले व शान कॉर्पोरेशन आणि सदगुरु बिल्डिंग, के. एस. खांडेकर रोड, परांजपे ए स्कीम, विले पार्ले (पूर्व) येथील संकुलातील बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत संबधित अधिकारी यांनी तक्रारदार यांच्या समवेत संयुक्त पद्धतीने स्थळ पाहणी करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

आझाद एम खान यांनी बेकायदेशीर बांधकाम व राज्याच्या महसूल नुकसानीबाबत तक्रार दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सह आयुक्त (दक्षता) गंगाथरण् डी. , अतिक्रमण निर्मूलन उपनगर मुंबई विभागाचे प्र.सहाय्यक अभियंता नितीन केणी व तक्रारदार आझाद एम खान व समशिर खान उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की, या बैठकीत तक्रारदार आझाद एम. खान यांनी बेकायदेशीर बांधकामांमुळे राज्याच्या महसुलाला मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची बाब उपस्थित केली आहे. त्यानुसार बेकायदेशीर बांधकामांबाबत तक्रारदारांसोबत संयुक्त स्थळ पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा आणि त्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी.

विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी सांगितले की, बेकायदेशीर बांधकामांबाबतची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी महापालिकेच्या इमारत परवानगी विभागाकडे अधिकृतरीत्या अर्ज करावा. यामुळे पुढील कारवाई सुलभ होईल.


 Give Feedback



 जाहिराती