सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजित पवार यवत मधे दाखल .तणावाची परिस्थिती नियंत्रणात
  • जीममध्ये सकाळी नेहमीप्रमाणे व्यायाम करताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू;पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
  • दुपारी बाजारपेठेत 20 वर्षीय व्यापारी तरुणावर गोळीबार; गळ्यातला सोन्याचा ऐवजही पळवला, घटनेने पिंपरी चिंचवड शहर हादरलं
  • दहशतवादाचा कोणताही रंग, धर्म नाही; मालेगाव बाॅम्बस्फोट निकाल देताना विशेष एनआयए न्यायाधीशांची टिप्पणी
  • 'माझ्याच देशाने आतंकवादी बनवलं',न्यायालयाच्या निर्णयानंतर साध्वी प्रज्ञांना अश्रु अनावर झाले. माझ्याच देशाने मला आतंकवादी बनवलं अशी खंत व्यक्त केली.
  • मोठी बातमी: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका; 17 वर्षांनंतर निकाल जाहीर
 जिल्हा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी दाखवलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन चालेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    01-08-2025 16:30:15

नागपूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कार्यातून समजाला दाखविलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन मार्गक्रमण करेल, असा विश्वास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात स्थित अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांनी ज्वलंत ठेवले आणि वंचितांचा आवाज समाजामध्ये पोहोचवण्याचे महत्वपूर्ण कार्य केले.

पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगाराच्या तळहातावर उभी असल्याची मांडणी त्यांनी आपल्या साहित्यातून केली. त्यांनी दाखवविलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर चालण्याचा राज्य शासन प्रयत्न करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी उपस्थित उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अभिजित वंजारी आणि संदीप जोशी, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनीही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले


 Give Feedback



 जाहिराती