सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिव्याच्या विजयाने मला तिहेरी अभिमान आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखच्या बुद्धीबळातील सुवर्ण विजयाचे कौतुक केले.
  • एकमेकांवर आरोप करून महाराष्ट्र आपल्याला अशांत करायचाय का? यवतमधील तणावावरून राज्यमंत्री रामदास आठवलेंनी विरोधकांना सुनावलं
  • पुण्यातील एमआयडीसीमध्ये अजितदादांची दादागिरी आहे का? फडणवीसांनी नावं जाहीर करावी; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर रोहित पवारांचा हल्लाबोल
  • ‘श्यामची आई’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
  • अजित पवार यवत मधे दाखल .तणावाची परिस्थिती नियंत्रणात
 जिल्हा

समाजसेवेसाठी शासकीय नोकरी हे महत्त्वाचे क्षेत्र -अपर मुख्य सचिव डॉ. विकास खारगे

डिजिटल पुणे    02-08-2025 14:38:31

ठाणे : समाजाची सेवा करण्यासाठी शासकीय नोकरी हे एक महत्त्वाचे क्षेत्र असून आपण प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) डॉ.विकास खारगे यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमात केले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, अपर आयुक्त वैशाली इंदानी, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके, सह आयुक्त रवी पाटील, रवींद्र पवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, अमित सानप, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, व्याख्याते डॉ. दत्ता कोहिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. खारगे पुढे म्हणाले की, महसूल विभाग हा शासनाचा चेहरा आहे. महसूल विभागाने कोणती कामे केली आहेत व कोणती कामे करणार आहे, हे जनतेपर्यंत पोहोचविले पाहिजे. महसूल विभागाने लोकांसाठी अधिक जबाबदारीने, पारदर्शक व विश्वासार्हपणे काम केले पाहिजे. महाराष्ट्राचे नाव देशातच नाही तर जगामध्ये घेतले जाते. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजक गुंतवणूक करीत आहेत. देशाच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा 15 टक्के वाटा आहे. आपले राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे.

ते पुढे म्हणाले की, महसूल विभाग इतर सर्व विभागांच्या समन्वयाने काम करतो. महसूल विभाग शासनाचे प्रतिनिधी आहे. लोकांना न्याय मिळेल अशी विश्वासार्हता निर्माण करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी सर्व विभागांनी एकत्र येवून काम करणे गरजेचे आहे. महसूल सप्ताह हा केवळ सात दिवसांचा नसून संपूर्ण वर्षभर आपण लोकांना उत्तम दर्जाची सेवा दिली पाहिजे. लोकाभिमुख कामे करणारा विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते. तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्व सेवा ऑनलाईन करण्यात याव्यात, जेणेकरुन जनतेला कुठूनही आपली कामे करता येतील. सर्व महसूल विभागात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावीपणे वापर झाला पाहिजे. महसूल विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. लोकांची कामे गतिमानतेने होतील, महसूल विभागावर जनतेचा विश्वास वाढेल, राज्याची प्रगती होईल, अशी सेवा आपण सर्वांनी मिळून करायाची आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अपर मुख्य सचिव (महसूल) डॉ. खारगे यांना कोकण विभागातील सात जिल्ह्यांची माहिती दिली. महसूल दिनानिमित्त पुरस्कार मिळालेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ज्यांना पुरस्कार मिळाल नाही त्यांनी आजून जोमाने काम करुन पुढच्या वर्षी पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

 

ते पुढे म्हणाले की, महसूल विभाग सर्व स्तरावर काम करतो. कोणतीही आपत्ती असो महसूल विभाग नागरिकांना सेवा पुरविण्यात अग्रेसर असतो. कोणतेही काम यशस्वी करायचे असेल तर ते काम महसूल विभागाकडे सोपविले जाते. कोकण विभागाला ऐतिहासिक वारसा आहे. कोकण विभागाने नागरिकांना उत्तमोत्तम सेवा पुरविण्यासाठी महत्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. आपले सेवा पोर्टलवरील सर्व सेवा ग्रामपंचायत स्तरावर सक्रीय करण्यात येणार आहेत. मुंबई उपनगरात ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड सुविधा सुरु करण्यात येणार आहे. जमिनीचे फेरफार क्लिअर करण्यात येणार आहेत. शिवदुर्ग दर्शन प्रकल्पांतर्गत 51 किल्ले निवडले असून त्यातील 35 बाबींचा अभ्यास सुरु आहे. कोकणात पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. पर्यटकांना उत्तमोत्तम सुविधा देण्यावर भर असेल. यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ सागरी किनारे ही मोहिम देखील प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ म्हणाले की, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. नागरिकांना लोकाभिमुख सेवा उपलब्ध करुन देणे ही महसूल विभागाची जबाबदारी व दायित्व आहे. त्यानुसार नागरिकांना उत्तम दर्जाची सेवा पुरविण्यासाठी महत्वाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी मॉडेल सेतू केंद्र तयार करण्यात येणार आहे. आपले सरकार सेवा केंद्राद्वारे गाव पातळीवर सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. डेटा बँक तयार करणार आहे. महसूल सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. शासन व प्रशासनाची सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगली प्रतिमा होण्यासाठी महसूल सप्ताहानिमित्त विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील.महसूल दिनानिमित्त डॉ. खारगे यांच्या हस्ते कोकण विभागातील सात जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.सूत्रसंचलन कल्पना साठे यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती