पुणे : गेल्या काही दिवसनापासून चाकण मधील वाहतूक समस्या हा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. त्याचे पडसाद अधिवेशनात सुद्धा बघायला मिळाले होते. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी भल्या पहाटेच भोसरीत येत कामाला सुरुवात केली. विशेष म्हणजे रात्री एक वाजता बीड जिल्हा दौरा आटपून अजित पवार पुण्यामध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पहाटेच भोसरीतील कामांची प्रथम पाहणी केली. नंतर चाकण मधील तळेगाव चौकात जाऊन थेट रस्त्यावर येत तेथील वाहतूक कोंडीच्या समस्येची माहिती घेतली आणि आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (८ ऑगस्ट) पहाटे चाकण चौक आणि परिसरातील वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी केली. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गाच्या संगमावर असलेला हा चौक नेहमीच प्रचंड कोंडीसाठी कुप्रसिद्ध आहे. चाकण एमआयडीसीत असलेल्या सुमारे १,५०० उद्योगांमध्ये साडेतीन लाख कर्मचारी कार्यरत आहेत. रोज लाखभर वाहनांची वर्दळ असल्याने या भागातील कोंडी फोडणे हे सरकारसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. पाहणीदरम्यान अजित पवार यांनी चाकणला स्वतंत्र महानगरपालिकेचा दर्जा मिळण्याची शक्यता व्यक्त केली.पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असती. याचं चौकातून चाकण एमआयडीसीमध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं.
या एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जा करतात. त्यामुळं या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. यावेळी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे सोबतच बारामतीची तुलना चाकण सोबत करू नका असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण दौऱ्यात मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की पुणे जिल्ह्यात लवकरच तीन नवीन महापालिका स्थापन कराव्या लागतील. यात मांजरी–फुरसुंगी–उरळी देवाची या परिसरासाठी एक, चाकण परिसरासाठी एक आणि हिंजवडी भागासाठी एक महापालिका उभारण्याचा विचार आहे. चाकण चौकातील वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यासाठी पवार पहाटे ५:४५ वाजता प्रत्यक्ष पोहोचले. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. तळेगाव–शिक्रापूर मार्ग सहापदरी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची आणि त्यानंतर पुणे–नाशिक मार्ग एलीवेटेड करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “चाकणची कोंडी संपवण्यासाठी पावले उचलणे अपरिहार्य आहे. लोकांनी सहनशीलता दाखवली, पण आता यातून मुक्तता देणं गरजेचं आहे. महानगरपालिका स्थापनेबाबत काहींना आवडेल, काहींना नाही, तरीही हा निर्णय घ्यावाच लागेल,” असेही पवारांनी ठामपणे सांगितले.
अजित पवारांनी पुणे जिल्ह्यात नव्याने तीन महापालिका कराव्या लागणार असल्याचे म्हटले आहे. यापैकी एक मांजरी, फुरसुंगी आणि उरळी देवाची या भागात, दुसरी चाकण परिसरात आणि तिसरी हिंजवडी भागात महापालिका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी ६ वाजताच्या पाहणीदरम्यान एक गाडी थांबली की लगेच गाड्यांच्या रांगा लागतात, तर पिक टाईममध्ये काय अवस्था होत असेल, असे त्यांनी म्हटले.
पाहणी करत असताना, चाकणच्या चौकात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहने रोखून धरली होती. यामुळे कोंडीत भर पडली. यावर अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले. “ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहने थांबवून कोंडी का केली आहे? सगळी वाहतूक सुरू करा,” असे अजित पवार म्हणाले. तसेच, चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा आढावा घेताना त्यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटोही दाखवले.