सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाती आला तर जीवे मारु, नवऱ्याच्या धमकीनंतर स्नेहाने आयुष्य संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
  • मुंबईत धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलींवर पाच जणांकडून सामूहिक अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
  • महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका; राज्य सरकार, नांदणी मठ आणि वनताराची संयुक्त दाखल करणार
  • राज्यात मराठा-ओबीसी दंगली घडल्यास देवेंद्र फडणवीसच जबाबदार; मनोज जरांगेंनी सांगितला मुंबईचा प्लॅन
 शहर

'हरीत भारत सायकल यात्रा' १५ ऑगस्ट पासून पर्यावरण संदेशाची अनोखी मोहीम

डिजिटल पुणे    11-08-2025 14:59:28

पुणे: 'इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप' यांच्या वतीने आयोजित 'हरीत भारत सायकल यात्रा' या मोहिमेचा शुभारंभ  १५  ऑगस्ट २०२५  रोजी सकाळी १० वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून होणार आहे. या यात्रेचे प्रमुख प्रवासी असलम इसाक बागवान असून ते १५ ऑगस्ट २०२५  पासून पुणे येथून भारतातील विविध राज्यांमध्ये पर्यावरणाचा संदेश घेऊन सायकलद्वारे  १४ मे २०२६ पर्यंत  प्रवास करतील.त्यांना पुणेकरांच्या वतीने शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम ए. एस. के. हॉल, मिठानगर, कोंढवा खुर्द, पुणे येथे  १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता  होणार आहे.

पुणे-खोपोली-भिवंडी-तापी-सुरत मार्गे गुजरात,राजस्थान,पंजाब,जम्मू कश्मीर,लेह लडाख-दिल्ली-उत्तर प्रदेश-बिहार-पश्चिम बंगाल-अंदमान-आंध्र प्रदेश-तामिळनाडू-कर्नाटक-महाराष्ट्र असा यात्रेचा मार्ग आहे.या सायकल यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे  पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, वृक्षारोपण आणि हरित क्रांतीला चालना देणे, प्रदूषणमुक्त भारतासाठी जनजागृती करणे, आरोग्यदायी जीवनशैली व सायकल संस्कृतीचा प्रसार करणे तसेच समानता, एकता, बंधुता आणि विश्वशांतीचा संदेश पसरवणे. यात्रेदरम्यान एक लाख वृक्ष देशभर लावले जाणार आहेत.आयोजकांनी सर्व नागरिक आणि आमंत्रित मान्यवरांना आवाहन केले आहे की, त्यांनी वेळेत कार्यक्रमस्थळी येऊन या ऐतिहासिक उपक्रमाचे साक्षीदार व्हावे आणि हरीत भारत अभियान यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा.


 Give Feedback



 जाहिराती