पुणे : पुणे जिल्ह्यातील भिमाशंकरजवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यात एक दुर्दैवी घटना घडली. जिल्ह्यातील भिमाशंकरजवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यात दुर्दैवी घटना घडली आहे. सहा डॉक्टरांची टीम फिरायला गेली होती. यावेळी एका डॉक्टरचा बुडून मृत्यू झाला आहे. सुबोध करंडे असं या डॉक्टरचं नाव आहे. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या स्थानिक तरुण दिलीप वनघरे यांचाही बुडून मृत्यू झाला. सध्या स्थानिकांच्या मदतीने देवकुंडात बचाव कार्य सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील भिमाशंकरजवळ आज धक्कादायक घटना घडली आहे. फिरयला गेलेल्या डॉक्टरचा बुडून मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर बुडलेल्या डॉक्टरला वाचवण्यासाठी गेलेल्या स्थानिक तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुबोध करंडे असं मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.