Jul 15 2025 18:50:23   सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू

 विश्लेषण

मोठी बातमी ! देशभरातील 28 विमानतळ भारतीय लष्कराच्या ताब्यात

डिजिटल पुणे    09-05-2025 14:59:41

मुंबई :  भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ड्रोनद्वारे अचूक हल्ले करत मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानंतर युद्धसदृश परिस्थिती तयार झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून देशांतर्गत सुरक्षेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. देशातील 28 प्रमुख विमानतळांचा ताबा लष्कराकडे हस्तांतरित तणाव वाढला, लष्कर सज्ज

भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्कर तिन्ही दलं पूर्ण तयारीत असून देशाच्या उत्तर, पश्चिम सीमांवर विशेष हालचाली सुरू झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरपासून राजस्थान आणि गुजरातपर्यंत सीमारेषांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

28 विमानतळ नागरी उड्डाणांसाठी बंद 

या यादीमध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, लखनऊ, जयपूर, श्रीनगर, अमृतसर, नागपूर, चंदीगढ यांसारख्या महत्त्वाच्या शहरांतील विमानतळांचा समावेश आहे. या विमानतळांचा ताबा हवाई दलाकडे देण्यात आला असून नागरी विमान सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

प्रवाशांसाठी नवे सुरक्षाप्रोटोकॉल

प्रवाशांनी विमानतळावर किमान 3 तास आधी पोहोचावं अशा सूचना करण्यात आल्याआहेत. शिवाय बोर्डिंग प्रक्रिया 75 मिनिटं आधी पूर्ण करावी लागेल

BCAS ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब बंधनकारक करण्यात आला आहे. दिल्ली, मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उड्डाण सुरळीत असलं तरी सशस्त्र सुरक्षा आणि स्कॅनिंग प्रक्रिया अधिक तीव्र करण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये गोंधळ

दुसरीकडे, पाकिस्तानातील लाहोर, कराची, इस्लामाबाद यांसारख्या विमानतळांवर परिस्थिती अत्यंत गोंधळाची झाली आहे. अनेक उड्डाणं रद्द झाली असून हजारो प्रवासी अडकले आहेत. काही विमानं हवेतून परत वळवण्यात आली आहेत.

भारताने पाकिस्तानवर 100+ क्षेपणास्त्र डागले

भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर ड्रोन हल्ले करून जबरदस्त प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळही ड्रोनचा स्फोट झाला असल्याचं वृत्त आहे. यासोबतच कराची बंदरावरही मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानकडून उधमपूर, जम्मू, अखनूर, नरगोटा येथे ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, पण भारताने सर्वच ड्रोन निष्प्रभ केले.

चंदीगढमध्ये संभाव्य हल्ल्याचा अलर्ट

चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही स्थिती किती गंभीर आहे, हे यातून स्पष्ट होत आहे.

देश सज्ज, पण सावध राहा

पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालय, आणि गृह मंत्रालय ताज्या घडामोडींवर बारकाईने नजर ठेवून आहेत. सरकारकडून अफवा टाळण्याचे आणि फक्त अधिकृत सूत्रांकडूनच माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 Give Feedback

 जाहिराती