पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे पत्रकार परिषद घेऊन निकालाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली
त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ परीक्षेला बसले होते. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी ९४.१० टक्के इतकी आहे. सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९८.८२टक्के इतका लागला. तर सर्वात कमी निकाल नागपूरचा म्हणजे ९०.७८ टक्के इतका लागला. दहावीच्या परीक्षेत एकूण ६२ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
दरम्यान, यंदा १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ९३.०४ टक्के आहे. फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल ९४.१० टक्के आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचा (खासगी, दिव्यांग, फ्रेश, पुनरपरीक्षार्थी) निकाल ९३.०४ टक्के आहे. तसेच यंदा २८ हजार १२ खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ९ हजार ६७३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यातील ८ हजार ८४८ उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.२७ टक्के इतकी आहे.
विभागनिहाय १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या
पुणे – १०, नागपूर – ०१, छत्रपती संभाजीनगर – ३२, मुंबई -०८, कोल्हापूर – ०३, अमरावती – ०७, नाशिक -० लातूर -११३ आणि कोकण – ०३
विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे प्रत्येक विषयातील गुण पाहायला मिळतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपपाल्या शाळेत त्यांची गुणपत्रिका मिळेल. यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल.
कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?
पुणे -९४.८१ टक्के
नागपूर- ९०.७८ टक्के
संभाजीनगर- ९२.८२ टक्के
मुंबई-९५.८४ टक्के
कोल्हापूर- ९६.७८ टक्के
अमरावती-९२.९५ टक्के
नाशिक- ९३.०४
लातूर-९२.७७
कोकण- ९९.८२
यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींची बाजी
बारावीनंतर आता दहावीच्या परीक्षेतही यंदा नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. यंदा राज्यात ९६.१४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलं उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही ९२.३१ इतकी आहे. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात मुली मुलांपेक्षा ३.८३ ने पुढे आहेत.
विद्यार्थ्यांना या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार
1.https://results.digilocker.gov.in
2. https://sscresult.mahahsscboard.in
3.http://sscresult.mkcl.org
4. https://results.targetpublications.org
5. https://results.navneet.com
6.https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
7.https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
8.https://www.indiatoday.in/education-today/results
9. https://www.aajtak.in/education/board-exam-results